Sachin Tendulkar : 'त्या' डीपफेक व्हिडिओवर सचिन तेंडुलकरची प्रतिक्रिया, अलर्ट राहण्यास सांगितलं

Sachin Tendulkar Reaction: सध्या इंटरनेटवर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात फिरतोय. ज्या व्हिडिओमध्ये सचिन तेंडुलकर एका मोबाइल अॅप्लिकेशनला मान्यता देताना दिसत आहेत. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिलीय.
Sachin Tendulkar
Sachin Tendulkar Saam Tv
Published On

Sachin Tendulkar Reaction On Deepfake Viral Video

सध्या फेमस होण्यासाठी सर्वजण मोठमोठ्या सेलिब्रेटींचा आधार घेतात. क्रिकेटपटू, अभिनेता यांच्या नावाने आपलं उत्पादन इतरांपर्यंत पोहोचवतात. असाच काहीसा प्रकार समोर आलाय. इंटरनेटवर एक व्हिडिओ फिरतोय. ज्यामध्ये क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) एका अॅपबद्दल माहिती देताना दिसत आहे. 'माझी मुलगी (सारा) दररोज या गेमिंग अॅपच्या साहाय्याने रोज ₹1.8 लाख कमवते..', असं सचिन तेंडुलकर म्हणत असल्याचं त्या व्हिडिओमध्ये दिसतंय. (latest sport news in marathi)

यामागे अधिक लोकांनी या अॅपकडे आकर्षित व्हावं, असा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या व्यक्तींचा हेतु आहे. यावर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नागरिकांना जागरूक राहण्याचं आवाहन

हा व्हिडिओ बनावट (deepfake video) असून तुम्हाला फसवण्यासाठी बनवला आहे. तंत्रज्ञानाचा गैरवापर करण्याचा हा प्रकार पूर्णपणे चुकीचा आहे. आपणा सर्वांना विनंती आहे की, असे व्हिडिओ किंवा अॅप्स किंवा जाहिराती दिसल्यास त्वरित कळवा.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने देखील सावधगिरी बाळगली पाहिजे. त्यांच्याविरुद्ध केलेल्या तक्रारींवर लवकरात लवकर कारवाई करावी. चुकीची माहिती आणि प्रसारित होणाऱ्या बातम्यांना आळा बसला पाहिजे. डीपफेकचा गैरवापर थांबवता यावा, यासाठी त्यांची भूमिका या बाबतीत खूप महत्त्वाची आहे, असं देखील त्यांनी (Sachin Tendulkar) ट्विट करत (Deepfake Viral Video) म्हटलंय.

पण व्हिडिओमध्ये तेंडुलकरचा आवाज आणि चेहरा मॉर्फ केल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. डीपफेक तंत्रज्ञानाला बळी पडलेला भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) एकटाच नाही, तर सारालाही असाच त्रास सहन करावा लागला आहे. रश्मिका मंदाना, कतरिना कैफ, आलिया भट्ट आणि काजोल यांसारख्या अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी देखील डीपफेक व्हिडिओंना बळी पडल्या आहेत.

डीपफेक म्हणजे काय

डीपफेक व्हिडिओमध्ये (Deepfake Video) कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून अतिवास्तववादी, अनेकदा भ्रामक, विद्यमान फुटेजवर चेहऱ्यावरील हावभाव आणि हालचाल हाताळून सामग्री तयार केली जाते. हे एखाद्या व्यक्तीचा आवाज, हावभाव आणि चेहऱ्यावरील वैशिष्ट्यांचं अचूक विश्लेषण आणि नक्कल करतात.

Sachin Tendulkar
Sachin Tendulkar Book News | सचिनच्या जीवनावर आधारीत पुस्तकाचं प्रदर्शन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com