Lakshya Sen, Common Wealth Games 2022, Badminton, India  saam tv
Sports

Common Wealth Games 2022 : जिद्दीनं खेळत लक्ष्य सेननं मिळविलं गाेल्ड; देशात फटाक्यांची आतषबाजी

लक्ष्य सेननं पहिला गेम गमावला हाेता.

Siddharth Latkar

Common Wealth Games 2022 : पीव्ही सिंधूनंतर राष्ट्रकुल स्पर्धेत आज बॅडमिंटनपटू लक्ष्य सेननं (Lakshya Sen) गाेल्डन कामगिरी करुन भारताचा क्रीडा क्षेत्रातील दबदबा सिद्ध केला. लक्ष्यनं मिळविलेल्या यशानंतर देशात क्रीडाप्रेमींनी (sports) फटाके फाेडले. (Lakshya Sen News)

या सामन्यातील पहिल्या गेममध्ये लक्ष्य सेननं उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन घडवलं. परंत त्यात त्याला यश आलं नाही. त्याने पहिला गेम (21-19) असा गमावला. त्यानंतर दुस-या गेमध्ये लक्ष्यनं काही अप्रतिम फटके मारत (18-08) अशी निर्णायक आघाडी घेतली. हा गेम लक्ष्य सेननं (21-09) असा जिंकला.

तिस-या गेममध्ये लक्ष्यनं पुन्हा एकदा मलेशियाच्या त्झे योंग याच्यावर दबाव ठेवला. लक्ष्यने स्वत:चे काैशल्यपणास लावत सामन्यावर पकड मिळविली. त्याने तिसरा गेम (21-16) असा जिंकला. लक्ष्य सेननं मलेशियाच्या त्झे योंगचा (19-21, 21-9 21-16) अशी मात केल्यानंतर पुरुष एकेरीत सुवर्णपदक जिंकल्याचा आनंदात त्याने प्रेक्षकांच्या दिशेने रॅकेट आणि त्यानंतर टी-शर्ट भिरकावला.

राष्ट्रकुल स्पर्धेत आज पीव्ही सिंधूनंतर वीस वर्षीय लक्ष्य सेननं देशास विसावं सुवर्णपदक जिंकून दिलं आहे. यामुळं आता देशाच्या एकूण पदकांची संख्या 57 वर पाेहचली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नाशिकच्या म्हाडा घोटाळा प्रकरणात पहिली अटक, सोनू मनवाणीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Jalgaon: साईबाबा मंदिराच्या भक्तनिवासाचा स्लॅब कोसळला, ७ जण गंभीर जखमी

Crime News : गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडला ₹६०० त रूम दिली, नंतर दोघांनी डाव रचला; १६ वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार

Sunil Gavaskar: ...हे भारतीयांच्या हत्येत योगदान दिल्यासारखंच! सुनील गावस्करांची काव्या मारनवर अप्रत्यक्ष टीका

Shocking: लग्नात रसगुल्ला खाल्ला, पुढच्या काही मिनिटात जीव गेला, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT