IPL 2022  Saam TV
Sports

दिल्लीच्या पराभवाने कोच पाँटिंग नाराज, ऋषभ पंतबाबत केले मोठे विधान

आयपीएलच्या 15 व्या पर्वात या ऋषभ पंतने मैदानावर असे काही निर्णय घेतेले त्यामुळे त्याला टीकेला सामोरे जावे लागले होते.

Pravin

दिल्ली कॅपिटल्सने इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) मध्ये गेल्या काही वर्षांत चांगली कामगिरी केली आहे. हा संघ 2019 पासून सतत चांगली कामगिरी करत आहे. आयपीएल-2022 चा हंगाम दिल्लीच्या संघासाठी फार काही चांगला नव्हता. संघ अगदी जवळ येऊन प्लेऑफमधून बाहेप पडला. कर्णधार ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) नेतृत्वाखालील दिल्लीच्या संघाला मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) पराभूत करून प्लेऑफमध्ये जाण्याची संधी होती, परंतु या संघाला तसे करता आले नाही. यानंतर संघाचे प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांनी पंतचा बचाव करत त्याला कर्णधार म्हणून पाठिंबा दिला आहे. पाँटिंगने म्हटले आहे की, पंत हा यष्टिरक्षक फलंदाज अजूनही खूप तरुण आहे आणि कर्णधारपदाच्या युक्त्या शिकत आहे त्यामुळे तो या पदासाठी योग्य पर्याय आहे.

आयपीएलच्या 15 व्या पर्वात या ऋषभ पंतने मैदानावर असे काही निर्णय घेतेले त्यामुळे त्याला टीकेला सामोरे जावे लागले होते. मुंबई इंडियन्स 14.3 षटकात 3 बाद 95 धावांवर होती तेव्हा पंतने एक चूक केली. टीम डेव्हिडला त्याच्या डावाच्या पहिल्या चेंडूवर बॅटला स्पर्श करुन गेलेल्या चेंडूवर डीआरएस घेण्यास नकार दिला आणि मैदानावरील पंचाने त्याला नाबाद दिले. त्यानंतर डेव्हिडने अवघ्या 11 चेंडूत चार षटकार आणि दोन चौकारांसह 34 धावा ठोकल्या, ज्यामुळे दिल्ली कॅपिटल्स सामना हरला.

कर्णधारपदासाठी पंत योग्य पर्याय

दिल्ली कॅपिटल्सचा मुंबई इंडियन्सकडून पाच विकेट्सने पराभव झाल्यानंतर पॉन्टिंग म्हणाला, “निश्चितपणे, माझ्या मनात कोणतीही शंका नाही की कर्णधारपदासाठी ऋषभ हाच योग्य पर्याय आहे, अगदी गेल्या मोसमापासून. . श्रेयसच्या खांद्याला दुखापत झाल्यानंतर कर्णधारपदाची धुरा सांभाळत ऋषभने संघासोबत चांगली कामगिरी केली आहे.

पंतला पराभवासाठी जबाबदार मानू नये

सामना हाताबाहेर जात असल्याचे पाहून खूप निराश झालो, पण पराभवासाठी पंतला दोष दिला नाही, असे पाँटिंग म्हणाला. तो एक युवा खेळाडू आहे आणि कर्णधारपदाचे बारकावे शिकत आहे. T20 संघाचा कर्णधार बनणे हे सोपे काम नाही, विशेषत: आयपीएलमध्ये जी इतकी तणावपूर्ण स्पर्धा आहे आणि तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीचे बारकाईने निरीक्षण केले जाते. त्याला निश्चितच माझा पूर्ण पाठिंबा आहे.

पाँटिंग म्हणाला की, खेळाच्या एका पैलूकडे बोट दाखवणे नेहमीच कठीण असते. आमच्या फलंदाजीत सलामीच्या फलंदाजांनी निराशा केली. आम्ही 40 धावांत चार विकेट गमावल्या, जे टी20 सामना योग्य नाही. विशेषत: मोठ्या सामन्यांमध्ये जिथे तुम्हाला जिंकायचे आहे.

खेळाडूंना शिकण्याची गरज

या सामन्यातून खेळाडूंनी शिकण्याची गरज असल्याचे पाँटिंग म्हणाला. तो म्हणाला, टीम डेव्हिड नक्कीच चांगला खेळला. तो कदाचित पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता पण खेळाचे अनेक पैलू आहेत जे आपल्याला निराश करतील. अशा सामन्यांमधून खेळाडूंनी शिकण्याची गरज आहे. सामना आमच्या हातातून निसटला, शेवटच्या काही षटकांत सामना आमच्या हातातून निसटला. याबद्दल मला खूप निराशा वाटत आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ITR Filling 2025: ITR फाइल करताना पासवर्ड विसरलात? काळजी करु नका, या पद्धतीने भरा रिटर्न

Maharashtra School: पहिलीच्या वेळापत्रकातून हिंदी हद्दपार, सुधारित वेळापत्रक जाहीर

Shukrawar che Upay: शुक्रवारच्या दिवशी 'या' चमत्कारी उपायांनी नशीब उजळेल; करियर-कुटुंबातील अडखळे होतील दूर

Indore Street Food: फक्त पोहेच नाही, इंदूरची 'हे' स्ट्रीट डिशेस देखील आहेत अव्वल दर्जाचे

Maharashtra Live News Update: विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत जाऊन पोहोचली

SCROLL FOR NEXT