virat kohli and chris gayle  Twitter
Sports

IPL 2023: ख्रिस गेलची भविष्यवाणी! विराट, रोहित नव्हे तर 'हाच' भारतीय तोडणार १७५ धांवाच्या खेळीचा रेकॉर्ड

KL Rahul: ख्रिस गेलने १७५ धावांच्या खेळीचा विक्रम कोण मोडू शकतो, याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

Ankush Dhavre

Chris Gayle on KL Rahul: येत्या काही दिवसात आयपीएल २०२३ स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत चौकार आणि षटकारांचा पाऊस पाहायला मिळणार आहे.

त्यामुळे सर्वत्र या स्पर्धेची चर्चा पाहायला मिळत आहे. दरम्यान ख्रिस गेलने १७५ धावांच्या खेळीचा विक्रम कोण मोडू शकतो, याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

ख्रिस गेल हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात विस्फोटक फलंदाजांपैकी एक आहे. या स्पर्धेत सर्वात मोठी खेळी करण्याचा विक्रम हा ख्रिस गेलच्या नावे आहे.

त्याने पुणे वॉरियर्स इंडिया संघाविरुध्द झालेल्या सामन्यात त्याने ६६ चेंडूंचा सामना करत नाबाद १७५ धावांची खेळी केली होती. या खेळीदरम्यान त्याने १३ चौकार आणि १७ षटकार मारले होते.

आयपीएल २०१३ मध्ये झालेला हा विक्रम अजूनही अबाधित आहे. आता ९ वर्षानंतर हा विक्रम कोण मोडू शकतो याबात ख्रिस गेलने मोठे वक्तव्य केले आहे.

ख्रिस गेलला जिओ सिनेमावरील एका कार्यक्रमात एक प्रश्न विचारला गेला होते की, १७५ धावांची खेळी करण्याचा विक्रम कोण मोडू शकतो? याचे उत्तर देत ख्रिस गेलने केएल राहूलचे नाव घेतले आहे. (Latest sports updates)

केएल राहुलचा आयपीएल रेकॉर्ड दमदार आहे. त्याने अनेकदा या स्पर्धेत अनेकदा तुफान फटकेबाजी करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला आहे.

त्याने या स्पर्धेतील १०९ सामन्यांमध्ये ३८८९ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ४ शतके झळकावली आहेत. केएल राहुल आणि ख्रिस गेल हे दोघेही एकाच संघातून एकत्र खेळले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kendra Trikon Rajyog: 12 महिन्यांनी शुक्र बनवणार केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' राशींना मिळणार भाग्याची साथ

Beed News : बीडमध्ये पावसाचा कहर; जिल्ह्यातील शाळा-कॉलेजला उद्या सुट्टी जाहीर

BMC Election 2025 : ठाकरे बंधू एकत्र, मुंबई महापालिका कोण जिंकणार? भाजप नेत्यांचं मोठ भाष्य, VIDEO

Pune Rain: लोणी काळभोरमध्ये पावसाचं थैमानं, शेती पाण्याखाली, घरात शिरलं पाणी; पाहा ड्रोन VIDEO

India Pakistan Cricket Match:भारताने पाकिस्तानला हरवले, पण पहलगाम हल्ल्यामुळे देशभरात क्रिकेटचा उत्साह ठप्प

SCROLL FOR NEXT