Child falls down in World Cup match saam tv
Sports

T20 World Cup : वर्ल्डकप मॅचमध्ये चिमुकला जखमी, स्टेडिअममध्ये डोक्यावरच आपटला, Video व्हायरल

टी20 वर्ल्डकपच्या एका सामन्यादरम्यान एक चिमुकला मैदानवर डोक्यावरच आपटला.

नरेश शेंडे

नवी दिल्ली : क्रिकेटचा सामना असो वा अन्य कोणता खेळ सामना सुरु असताना मैदानावर अनेक चित्रविचित्र गोष्टी घडताना आपल्याला दिसतात. नुकताच दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर आला होता. तेव्हा एका सामन्यादरम्यान मैदानावर अचानक साप आला. स्टार क्रिकेटर्सचे चाहते थेट मैदानावरून धावत आपल्या आवडीच्या खेळाडूंना भेटायला आल्याचंही आपण याआधी पाहिलं आहे.

मात्र, आता यावेळी आता काहीसं वेगळं पाहायला मिळालं आहे. हे दृष्य पाहून सर्वच हैरान झाले आहेत. ऑस्ट्रेलियात टी20 वर्ल्डकपच्या (T20 World Cup) एका सामन्यादरम्यान एक चिमुकला मैदानवर डोक्यावरच आपटला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. जखमी झालेल्या मुलाची प्रकृती ठिक होण्यासाठी लोकांनी प्रार्थनाही केली . (child falls down during west indies vs Scotland match)

मैदानात डोक्यावरच पडला चिमुकला

ऑस्ट्रेलियात टी-20 वर्ल्डकपचा थरार सुरु झाला असून वेस्ट इंडिज आणि स्कॉटलंडमध्ये क्वालिफाईंग राउंडचा सामना रंगला होता. या सामन्यादरम्यान हा मुलगा स्टेडिअमजवळ धावत होता. याचदरम्यान त्याचा तोल गेला आणि तो लोखंडी पाईपावरून मैदानात पडला.

ही घटना कॅमेरात कैद झाली आणि मुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. या व्हिडिओ पोस्टवर ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट बोर्डाचे सीईओ निक हॉकलीने कमेंट केली आहे. सर्व काही ठिक आहे, अशी अपेक्षा करतो. मी यावेळी होबार्टमध्ये नाहीय. पण मुलगा ठिक आहे, असं समजतो, अशा प्रकारची कमेंट त्यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Charges: महत्त्वाची बातमी; आता बँक व्यवहारांवर आकारणार शुल्क, कधीपासून लागू होणार नियम?

Mumbai High Court: कबुतरखान्यावरून मराठीविरुद्ध जैन; हायकोर्टाकडून बंदी कायम

Adult Video: शाळेत वर्ग सुरू असतानाच एलईडी स्क्रीनवर लागला पॉर्न; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Hair Care Tips: आठवड्यातून केसांना कितीवेळा तेल लावावे?

Tuljapur Tulja Bhavani Mandir : तुळजा भवानी मंदिराचा गाभारा पाडणार? मंदिर जीर्णोद्धावरुन तुळजापुरात राडा

SCROLL FOR NEXT