cheteshwar pujara twitter
Sports

Cheteshwar Pujara: आयपीएल सुरु असताना पुजाराचा धमाका! गोलंदाजांची धुलाई करत झळकावले तुफानी शतक

Cheteshwar Pujara Century: भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा जोरदार फॉर्ममध्ये असल्याचे दिसून येत आहे.

Ankush Dhavre

County Championship: सध्या भारतात आयपीएल स्पर्धेचा थरार सुरु आहे. या स्पर्धेत गोलंदाज आणि फलंदाजांचा बोलबाला सुरु आहे. फलंदाज चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत शतक झळकावताना दिसून येत आहेत. तर दुसरीकडे भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी जोरदार फॉर्ममध्ये असल्याचे दिसून येत आहे.

सध्या इंग्लंडमध्ये काऊंटी स्पर्धेचा थरार सुरु आहे. या स्पर्धेत भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा हा ससेक्स संघाकडून खेळतोय. या संघाकडून खेळताना तो जोरदार कामगिरी करतोय. त्याने या संघाकडून खेळताना अवघ्या १२ व्या सामन्यात ७ वे शतक झळकावले आहे. यावेळी त्याने ग्लुसेस्टरशायर संघाकडून खेळताना शतक झळकावले आहे.

संघातील सलामीवीर फलंदाज स्वस्तात माघारी परतल्यानंतर चेतेश्वर पुजाराने संघाची जबाबदारी आपल्या खांदयावर घेतली. त्याने टॉम अल्सोप सोबत मिळून तिसऱ्या विकेटसाठी १०० धावांची भागीदारी केली.

टॉम अल्सोप ६७ धावा करत माघारी परतला. तर चेतेश्वर पुजाराने आपली खेळी सुरु ठेवली होती. दुसऱ्या दिवसाच्या समाप्तीनंतर चेतेश्वर पुजारा ९९ धावांवर फलंदाजी करत होता. तिसऱ्या दिवशी त्याने आपले शतक पूर्ण केले. (Latest sports updates)

या शतकी खेळीसह त्याने वसिम जाफरला मागे सोडलं आहे. तो प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थानी पोहोचला आहे. या यादीत भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि सुनील गावसकर सर्वोच्च स्थानी आहेत.सचिन तेंडुलकर आणि सुनील गावसकर यांनी ८१ शतके झळकाव आहेत. तर राहुल द्रविडने ६८ आणि विजय हजारे यांनी ६० शतके झळकावली आहेत.

चेतेश्वर पुजारा हा भारतीय कसोटी संघातील प्रमुख फलंदाज आहे. आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम समान्यात जर भारतीय संघाला विजय मिळवायचा असेल तर, पुजाराने जबाबदारी घेऊन फलंदाजी करणं गरजेचं असणार आहे. मात्र त्याचा फॉर्म पाहता आणि त्याची फलंदाजी पाहता नक्कीच ऑस्टेलियाच्या गोलंदाजांची चिंता वाढली असेल. (Cheteshwar Pujara Century)

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी असा आहे भारतीय संघ (WTC Squads)

भारतीय संघ (Team India WTC Final squad) :

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: परळीतील दिवंगत व्यापारी महादेव मुंडे यांच्या मुलाला मारहाण

Beed Crime : मुंडेंच्या मुलाला कराड समर्थकाची मारहाण, ट्युशनवरून येताना अडवले अन्...

Air Strike : पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर एअरस्ट्राइक; रमजानमध्ये झालेल्या भीषण हल्ल्यात १७ जणांचा मृत्यू

Bribe Case: मोठी बातमी! फाईल पुढे सरकवण्यासाठी ठेकेदाराकडे पैशांची मागणी; 1 लाख 30 हजारांची लाच घेताना मनपा कंत्राटी अभियंत्याला रंगेहाथ पकडलं

३ मुलांना विष पाजले, बायकोचा गळा चिरला आणि स्वत:ला गळफास लावला, कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; टोकाचे पाऊल का उचलले?

SCROLL FOR NEXT