Chetehswar pujara Saam Tv
Sports

IND vs AUS: अख्खी टीम ढेपाळली, पण पुजारा फेव्हिकॉलसारखा चिकटला; कोहलीचा तो सल्ला कामी आला - PHOTO

एकीकडे फलंदाज येत जात असताना चेतेश्वर पुजारा एक बाजू सांभाळून उभा होता.

Ankush Dhavre

IND VS AUS Cheteshwar pujara: बॉर्डर गावसकर ट्रॉफीत नवा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील सुरुवातीचे दोन सामने गमावल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघाने तिसऱ्या सामन्यात जोरदार पुनरागमन केले आहे.

तर भारतीय संघ बॅकफूटवर असल्याचे पाहायला मिळाले आहे. एकीकडे फलंदाज येत जात असताना चेतेश्वर पुजारा एक बाजू सांभाळून उभा होता. यादरम्यान त्याने तुफानी अर्धशतकी खेळी केली. (Latest sports updates)

भारतीय संघाचा पहिला डाव अवघ्या १०९ धावांवर संपुष्ठात आला होता. त्यामुळे ज्यावेळी भारतीय संघातील फलंदाजांकडून दुसऱ्या डावात चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. मात्र दुसऱ्या डावातही भारतीय फलंदाज स्वस्तात माघारी परतले. मात्र चेतेश्वर पुजाराने संयमी खेळी करत, १४२ चेंडूंचा सामना करत ५९ धावांची खेळी केली.

विराटचा गुरुमंत्र ठरला फायदेशीर..

भारतीय संघातील अनुभवी फलंदाज असलेल्या पुजाराला या मालिकेतील पहिल्या २ सामान्यांमध्ये हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. या सामन्यातील पहिल्या डावात देखील तो स्वस्तात माघारी परतला होता.

मात्र दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु होण्यापूर्वी विराट कोहलीने चेतेश्वर पुजाराला काही खास टिप्स दिले होते. ज्याचा फायदा घेत त्याने निडर होऊन ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा सामना केला. विराटने पुजाराला जास्तीत जास्त फ्रंट फूटवर खेळण्याचा सल्ला दिला. हाच सल्ला त्याचासाठी फायदेशीर ठरताना दिसतोय.

ऑस्ट्रेलियाचा डाव १९७ धावांवर संपुष्ठात..

पहिल्या दिवशी आघाडीवर असलेला ऑस्ट्रेलिया संघ दुसऱ्या दिवशी मोठी धावसंख्या उभारणार असे वाटत होते. मात्र उमेश यादव आणि आर अश्विनने भारतीय संघाला जोरदार कमबॅक करून दिले. दुसऱ्या दिवशी पीटर हॅंड्सकॉम्ब बाद होताच ऑस्ट्रेलियाचे फलंदाज एकापाठोपाठ एक माघारी परतले. या डावात रवींद्र जडेजाने सर्वाधीक ४, उमेश यादवने ३ आणि आर अश्विनने ३ गडी बाद केले. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव अवघ्या १९७ धावांवर संपुष्ठात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Typhoid: टायफॉइडची सुरुवातीची लक्षणे कोणती? वेळीच घ्या काळजी

Bhaskar Jadhav : भास्कर जाधवांनी पुन्हा ब्राह्मण समाजाला डिवचलं; व्हॉट्सअॅप स्टेटसवर पेशव्यांचा इतिहास काढला, VIDEO

Rahul Gandhi: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', व्हिडिओ पोस्ट करत लगावला निवडणूक आयोगाला टोला| Video Viral

Maharashtra Live News Update: पुण्यात जिम ट्रेनर लेडीने लोखंडी रॉडने मारहाण करून केला तरुणाचा खून

सर्वात मोठी बातमी! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना ईडीकडून अटक

SCROLL FOR NEXT