cheteshwar pujara google
क्रीडा

Cheteshwar Pujara Record: डबल सेंच्युरीसह पुजाराने रचला इतिहास! मोठ्या रेकॉर्डमध्ये डॉन ब्रॅडमनच्या यादीत मिळवलं स्थान

Ankush Dhavre

Cheteshwar Pujara Joins Don Bradman Record List:

रणजी ट्रॉफी स्पर्धेत चेतेश्वर पुजाराची अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळत आहे. सौराष्ट्र संघाकडून खेळताना त्याने झारखंडविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात दुहेरी शतक झळकावलं आहे. त्याने या सामन्यातील पहिल्या डावात नाबाद २४३ धावांची खेळी केली. या दुहेरी शतकी खेळीसह त्याच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.

या दुहेरी शतकी खेळीसह तो प्रथम श्रेणीमध्ये सर्वाधिक दुहेरी शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत संयुक्तरित्या चौथ्य स्थानी पोहोचला आहे. यासह त्याने क्रिकेटचे दिग्गज खेळाडू सर डॉन ब्रॅडमन यांच्या यादीत प्रवेश केला आहे.

झारखंडविरुद्ध झळकावलेले हे दुहेरी शतक त्याच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीतील १७ वे दुहेरी शतक ठरले आहे. त्याने या सामन्यात नाबाद २४३ धावा चोपल्या. यादरम्यान त्याने ३० चौकार मारले. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक दुहेरी शतकं झळकावण्याचा रेकॉर्ड हा सर डॉन ब्रॅडमन यांच्या नावावर आहे.

डॉन ब्रॅडमन यांनी ३७ दुहेरी शतकं झळकावली होती. तर दुसऱ्या स्थानी असलेल्या वॉली हेमंड यांनी ३६ देुहेरी शतकं झळकावली. पॅट्सी हेंड्रन या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. त्यांनी २२ दुहेरी शतकं झळकावली होती. रामप्रकाश आणि चेतेश्वर पुजारा यांनी प्रत्येकी १७-१७ दुहेरी शतकं झळकावली आहेत. (Latest sports updates)

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक दुहेरी शतकं झळकावणारे फलंदाज..

३७ दुहेरी शतकं-डॉन ब्रॅडमन (ऑस्ट्रेलिया)

३६ दुहेरी शतकं - वॉली हेमंड (इंग्लंड)

२२ दुहेरी शतकं - हेंड्रेन (इंग्लंड)

१७ दुहेरी शतकं - सटक्लिफ (इंग्लंड)

१७ दुहेरी शतकं - रामप्रकाश (इंग्लंड)

१७ दुहेरी शतकं - चेतेश्वर पुजारा (भारत).

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या ५व्या सीझनची Happy Ending; मात्र 'या' सद्याचे केले भरभरुन कौतुक..

Bigg Boss Marathi 5 Jahnavi Killekar : बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर जान्हवीची पहिली पोस्ट म्हणाली, "७० दिवसाच्या प्रवासानंतर..."

IND vs BAN: 0,0,0,0,0,0..टीम इंडियाची स्पीड मशीन जोमात; Mayank ने पहिल्याच ओव्हरमध्ये नोंदवला मोठा रेकॉर्ड

Pune Crime : ड्रग्स, कोयते गँग, हिट अॅण्ड रन; पुणे बनलंय क्राईम कॅपिटल

Bigg Boss Marathi 5 Winner: अखेर तो क्षण आला! 'सुरज'चा गुलीगत विजय, ठरला बिग बॉस मराठी 5 व्या पर्वाचा विनर; मिळाले 'इतके' लाख रुपये

SCROLL FOR NEXT