बिग बॉस मराठी सीझन 5 च्या ग्रँड फिनालेला रंगतदार सुरूवात झाली आहे. या सीझनमध्ये निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, धनंजय पोवार, सूरज चव्हाण, जान्हवी किल्लेकर, अंकिता वालावलकर हे टॉप ६ स्पर्धक बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचे फानलिस्ट ठरले होते. अशातच टॉप ६मधून जान्हवी किल्लेकर बाहेर पडली आहे.
ग्रँड फिनाले दरम्यान, टॉप ६ सदस्यांना आधी सात लाख रुपये रोख रक्कम घेऊन खेळ सोडण्याची संधी देण्यात आली होती. पण कोणत्याच सदस्याने हा शो सोडणार नसल्याचं म्हटलं. त्यानंतर रक्कम दोन लाखांनी वाढवून ९ लाख रुपये करण्यात आले. तेव्हा जान्हवीने ही रक्कम घेऊन खेळ सोडण्याचा निर्णय घेतला.जान्हवीने योग्य निर्णय घेतला आणि ९ लाख रुपयांची मनी बॅग घेऊन बाहेर पडायचं ठरवलं. आता बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर जान्हवीने पहिली पोस्ट शेअर केली आहे.
पोस्टमध्ये जान्हवीने, "बिग बॉसच्या घरात जाताना मी #killergirl म्हणून गेली होती आणि आता ७० दिवसाच्या प्रवासानंतर तुम्ही सगळ्यांनी मला #taskqueen म्हणून इतकं प्रेम दिलंत त्यासाठी धन्यवाद असं म्हटलं आहे.
पुढे पोस्टमध्ये, “बिग बॉसचा खेळ या टप्प्यावर खूपच कठीण झाला होता! त्यात मला त्यावेळी जे बरोबर वाटलं ते मी केलं. तुम्ही सगळ्यांनी माझी आजपर्यंत इतकी साथ दिली त्यासाठी तुम्हा सगळ्यांची मी खूप खूप मनापासून आभारी आहे. जाता जाता ही #taskqueen चा किताब घेऊनच बाहेर आली! परत एकदा मनापासून धन्यवाद!” असं कॅप्शन दिलं आहे.
'बिग बॉस मराठी'च्या या सीझन ग्रँड फिनाले दरम्यान विजेता कोण होणार याचं काऊंटडाऊन सुरू झाल्याने प्रेक्षकांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. बिग बॉस यंदाच्या सीझनचा कोण विजेता होणार आणि 'बिग बॉस मराठी'च्या मानाच्या ट्रॉफीवर कोण आपलं नाव कोरणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.