Cheteshwar Pujara Saam TV
Sports

Cheteshwar Pujara : चेतेश्वर पुजाराने रचला इतिहास; क्रिकेटच्या पंढरीत केला भीमपराक्रम

पुजाराने द्विशतक झळकावत एक मोठा इतिहास रचला

Satish Daud

लंडन : टीम इंडियाचा (Team India) स्टार फलंदाज चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. पुजाराने काऊंटी क्रिकेटमध्ये शतकांचा जणू धडाकाच लावला आहे. सक्सेस टीमचा कर्णधार बनल्यानंतर पुजाराने मिडल ससेक्सविरुद्ध शानदार फलंदाजी केली. पुजाराने द्विशतक झळकावत एक मोठा इतिहास रचला. (Cheteshwar Pujara Cricket News)

आपल्या सुरेख खेळीदरम्यान पुजाराने 399 चेंडूंचा सामना करत नाबाद 230 धावा केल्या. यामध्ये त्याने 21 चौकार आणि 3 उत्कृष्ट षटकार ठोकले. कर्णधारपदाला साजेशी खेळी करताना त्याने क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर द्विशतक ठोकले. या सामन्यादरम्यान त्याने एक विशेष कामगिरीही केली. काऊंटी क्रिकेटमध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर द्विशतक ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज ठरण्याचा मान चेतेश्वर पुजाराने पटकावला.

काऊंटी क्रिकेटच्या एका मोसमात सलग 3 द्विशतके झळकावणारा तो 118 वर्षांतील पहिला खेळाडू ठरला. म्हणजेच त्याच्याआधी इतर कोणत्याही खेळाडूने हा विशेष पराक्रम केला नव्हता.मिडलससेक्स विरुद्ध खेळताना मंगळवारीच पुजाराने आपलं शतक पूर्ण केलं. बुधवारी मैदानावर उतरल्यानंतर त्याने सुरुवातीला सावध फलंदाजी केली.

खेळपट्टीवर जम बसल्यानंतर त्याने अनेक शानदार फटके खेळत या मोसमातील तिसरे द्विशतक पूर्ण केले. सध्या तो आपल्या 230 धावा करून नाबाद आहे. भारतीय कसोटी संघातील महत्त्वाचा सदस्य असलेल्या पुजाराचे या मोसमातील सात काउंटी सामन्यांमध्ये पाचवे शतक आहे. एकवेळ ससेक्स संघांची स्थिती 2 बाद 99 अशी होती.

मात्र पुजाराने टॉम अॅस्लॉप (135) सोबत तिसऱ्या विकेटसाठी 219 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करून संघाला पुन्हा रुळावर आणले. पुजाराने भारतीय संघासाठी कसोटी क्रिकेटमध्येही अनेक महत्त्वपूर्ण खेळी खेळल्या आहेत. टीम इंडियाकडून 96 कसोटी सामने खेळताना त्याने 164 डावांमध्ये 43.8 च्या सरासरीने 6792 धावा केल्या आहेत.

कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 18 शतके आणि 33 अर्धशतके आहेत. त्याची कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजी कामगिरी नाबाद 206 आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: रोहिणी खडसे घेणार पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट

Hindi Sakti : हिंदी सक्तीविरोधात शालेय अभ्यासक्रमात मोठे बदल | VIDEO

Weight loss tips : आता वजन कमी करण्यासाठी व्यायामाची गरज नाही, फक्त या ३ गोष्टी लक्षात ठेवा

Pune Rave Party: खराडी रेव्ह पार्टी प्रकरणात मोठी अपडेट, त्याच सूटमध्ये २४ तास आधीही रंगली होती पार्टी

नवऱ्याला रेव्ह पार्टीत बेड्या, २४ तासानंतर रोहिणी खडसेंची प्रतिक्रिया, दोन ओळीत विषय संपवला

SCROLL FOR NEXT