cheteshwar pujara saam tv
Sports

Cheteshwar Pujara: पुजारा म्हणजे शंभर नंबरी सोनं! IPL ला लाथ मारत पठ्ठा गाजवतोय इंग्लंडचं मैदान

Cheteshwar Pujara Century: पुजाराने पुन्हा एकदा जोरदार शतक झळकावत सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

Ankush Dhavre

Cheteshwar Pujara Centuries In County Championship: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा बिगुल वाजला आहे. आयपीएल झाल्यानंतर ७ ते ११ जून दरम्यान या सामन्याचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघातील अनुभवी खेळाडू चेतेश्वर पुजाराची जोरदार तयारी सुरू आहे.

एकीकडे टी -२० स्पर्धेचा थरार सुरू असताना, चेतेश्वर पुजारा इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या काउंटी स्पर्धेत जोरदार कामगिरी करताना दिसून येत आहे.

दरम्यान त्याने पुन्हा एकदा जोरदार शतक झळकावत सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या काउंटी क्रिकेट स्पर्धेत पुजारा गोलंदाजांवर तुटून पडताना दिसून येत आहे. नुकताच त्याने वोर्सेस्टरशर संघाविरुद्ध खेळताना शतक झळकावले आहे. हे गेल्या चौथ्या सामन्यातील तिसरे शतक आहे. यापूर्वी त्याने ग्लुसेस्टरशर आणि डरहम संघाविरुद्ध खेळताना शतक झळकावलं होतं.

डरहम संघाविरुद्ध खेळताना त्याने ११५ धावांची खेळी केली. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात यॉर्कशर संघाविरुद्ध त्याला हवी तशी कामगिरी करता आली नाही. तिसऱ्या सामन्यात ग्लुसेस्टरशर संघाविरुद्ध खेळताना त्याने १५१ धावांची खेळी केली होती.

गेल्या ४ सामन्यातील तिसरे शतक..

पुजारा ससेक्स संघाचा कर्णधार आहे. या संघाकडून तो या हंगामातील चौथा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. या सामन्यात वोर्सेस्टरशर संधने प्रथम फलंदाजी करताना २६४ धावा केल्या होत्या. तर प्रत्युत्तरात ससेक्स संघाने पुजाराच्या शतकी खेळीच्या ३७३ धावांचा डोंगर उभारला.

पुजाराने तब्बल २८९ मिनिटं फलंदाजी केली. यादरम्यान त्याने १३६ धावांची खेळी केली. त्याने १९ चौकार आणि १ षटकार मारला. हे त्याच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमधील ५९ वे शतक आहे. तर ससेक्स संघासाठी या हंगामात झळकावलेले तिसरे शतक आहे. (Latest sports updates)

सर्वाधिक धावा करणारा फलंदाज...

इंग्लंडच्या मैदानावर सुरू असलेल्या काउंटी चॅम्पियनशिप स्पर्धेच्या डिव्हिजन २ च्या सामन्यांमध्ये पुजाराने ३ शतकी खेळी सह ४६८ धावा केल्या आहेत. तो या स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.

ही भारतीय संघाला दिलासा देणारी बातमी आहे. कारण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Boondi Ladoo Recipe: संध्याकाळी लागलेल्या भूकेसाठी झटपट बनवा टेस्टी बुंदी लाडू

Maharashtra Live News Update: जामखेली धरण पूर्ण क्षमतेने भरून झाले ओव्हरफ्लो

Nitesh Rane : विषय थेट अंतरपाटापर्यंत गेला, यांच्यामध्ये नवरदेव कोण अन् नवरी कोण? नितेश राणेंचा खोचक सवाल

Thackeray: पुष्पा ते लाडकी बहीण, मुंबईत ठाकरेंची तोफ धडाडली; उद्धव ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT