Sports

Chess Olympiad: भारत बनला चॅम्पियन; पुरुष आणि महिला गटात सुवर्णपदक जिंकत रचला इतिहास

Chess Olympiad: बुद्धीबळ ऑलिम्पियाडच्या इतिहासात भारताला यापूर्वी कोणत्याही प्रकारात सुवर्णपदक मिळाले नव्हते. यावेळी मात्र भारतीय खेळाडूंनी पुरुष आणि महिला गटात एकाच वेळी सुवर्णपदक जिंकून इतिहास रचलाय. पुरुष संघाने स्लोव्हेनियाचा तर महिला संघाने अझरबैजानचा शेवटच्या फेरीत पराभव केलाय.

Bharat Jadhav

बुद्धीबळ खेळात भारतीय खेळाडूंनी इतिहास रचलाय. या खेळाडूंनी भारत देशाचं नाव इतिहासाच्या सोनेरी पानात लिहिलय. कुस्तीच्या इतिहासात प्रथमच भारताने ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदक जिंकलंय. हंगेरीमध्ये चालू असलेल्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड २०२४ मध्ये भारत प्रथमच खुल्या विभागात (पुरुष) आणि महिला गटात एकाच वेळी चॅम्पियन बनलाय.

डी गुकेश, आर प्रग्नानंद, अर्जुन एरिगेसी यांच्यासह ५ खेळाडूंचा समावेश असलेल्या भारतीय पुरुष संघाने खुल्या गटात सुवर्णपदक जिंकले. त्यानंतर तानिया सचदेव, आर वैशाली, दिव्या देशमुख यांचा समावेश असलेल्या महिला संघानेही सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. भारताने दोन्ही प्रकारात प्रथमच सुवर्ण तर जिंकलेच पण एकाच वेळी दोन्ही संघांनी सुवर्णपदके जिंकल्याने इतिहास नोंदवलाय.

हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या ४५व्या बुद्धीबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताला आधीपासून विजेतेपदाचा दावेदार मानले जात होते. ही स्पर्धा जगातील सर्वात मोठी स्पर्धा असून इंटरनॅशल चेस फेडरेशनकडून आयोजित करण्यात येते. ज्यामध्ये विविध देश सहभागी होतात. भारताने २०२२ मध्ये प्रथमच त्याचे यजमानपद भूषवले. त्यानंतर खुल्या विभागात आणि महिलांच्या स्पर्धेत भारताने कांस्यपदक जिंकले होते. भारतीय पुरुषांनी यापूर्वी २०१४ मध्येही कांस्यपदक जिंकले होते. परंतु भारत प्रथमच दोन्ही स्पर्धांमध्ये चॅम्पियन बनला.

भारताकडून यावेळी ओपन सेक्शनमध्ये गुकेश, प्रग्नानंद, अर्जुन एरिगेसी, विदित गुजराती आणि पी हरिकृष्णा यांच्या संघाने स्पर्धेत भाग घेतला होता. भारतीय संघाने अमेरिकेच्या विरुद्धात विजय मिळवत आपलं सुवर्ण पदक निश्चित केलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jiya Shankar: जियाच्या सौंदर्याने वेड लावलं, फोटो लगेच पाहाच

Maharashtra Live News Update: राज्य सरकारच्या ओबीसी विभागाची आज महत्त्वाची बैठक

Brain Health : मिल्कशेक आणि जंक फूड खाताय? मेंदूवर होतोय गंभीर परिणाम, जाणून घ्या धक्कादायक रिपोर्ट

Ballaleshwar Temple Pali : नाद करायचा नाय! पूजेचं साहित्य विकणाऱ्या मराठी व्यावसायिकचा दुकानात आलेल्या विदेशी पर्यटकांसोबत थाई भाषेतून संवाद; पर्यटक आवाक

OBC Reservation : मराठ्यांचं कुणबी प्रमाणपत्र रद्द होणार? वकील योगेश केदार यांनी सांगितली अडचण, आता नवी मागणी चर्चेत

SCROLL FOR NEXT