चॅम्पियन्स ट्रॉफीच्या चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला मोठा दणका दिला. इंग्लंडने दिलेला आव्हानांचा डोंगर ऑस्ट्रेलियाने पाच गडी राखून पार केला. ऑस्ट्रेलियाने ४७.३ षटकात इंग्लंडने दिलेले आव्हान पार केलं. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर ऐतिहासिक विजय मिळवला आहे.
ऑस्ट्रेलियाने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विजयी सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियाने शनिवारी इंग्लंडविरोधात ५ विकेट राखून ऐतिहासिक विजय मिळवला. लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात इंग्लंडने ८ विकेट गमावून ३५१ धावा कुटल्या. इंग्लंडने दिलेलं आव्हान ऑस्ट्रेलियाने ४७.३ षटकात पूर्ण केलं. ऑस्ट्रेलियाने ४३.३ षटकात ५ गडी गमावून ३५६ धावा कुटल्या. ऑस्ट्रेलियाने चॅम्पियन्स ट्रॉफीमधील सर्वाधिक धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला.
ऑस्ट्रेलियाचा विकेटकिपर जोश इंग्लिसने इंग्लंडच्या गोलंदाजांना धू धू धुतलं. त्याने ८८ चेंडूत ८ चौकार आणि ६ षटकार लगावत १२० धावा कुटल्या. त्याने वनडेमधील पहिलं शतक ठोकलं. इंग्लिस आणि अलेक्स कॅरीच्या साथीने १४६ धावांची भागिदारी रचली. मॅथ्यू शार्टने ६३ धावांचं योगदान दिलं. ट्रॅव्हिस हेड आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथने ५ धावा कुटल्या. ग्लेन मॅक्सवेल ३२ धावा करून नाबाद राहिला. त्याने १५ चेंडूत चार चौकार आणि २ षटकार लगावले.
दरम्यान, इंग्लंडने डकेटच्या १६५ धावांच्या मदतीने सर्वात मोठी धावसंख्या उभारली. मागील वर्षी झालेल्या टी२० विश्वचषकातील सामन्यात डकेटला संघात स्थानही मिळवता आलं नव्हतं. मात्र, आता मिळालेल्या संधीचा त्याने पूरेपूर फायदा घेतला. त्याने १४३ चेंडूत १७ चौकार, ३ षटकार लगावले. त्याच्या जीवावर इंग्लंडने चॅम्पियन्स ट्रॉफीमधील सर्वाधिक मोठी धावसंख्या उभारली. त्याच्या व्यतिरिक्त रुटने ७८ चेंडूत ६८ धावा कुटल्या. कर्णधार बटलरने २३ धावा कुटल्या. जोफ्रा आर्चर २१ धावा करून नाबाद राहिला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.