Champions Trophy google
Sports

Champions Trophy 2025: फायनलआधी टीम इंडियासाठी खूशखबर, भारताला नडणारा न्यूझीलंडचा स्टार खेळाडू बाहेर?

Matt Henry Ruled Out from Champions Trophy 2025 Final: न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्री भारतविरुद्धच्या चॅम्पियन्स ट्रॅाफीच्या अंतिम सामना खेळण्याची शक्यता कमी आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

चॅम्पियन्स ट्रॅाफी २०२५ च्या अंतिम सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. तर दुसरीकडे न्यूझीलंड संघासाठी एक वाईट बातमी आहे. खांद्याच्या दुखापतीमुळे न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्री भारतविरुद्धच्या अंतिम सामन्यातून बाहेर पडू शकतो.

दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीची अंतिम सामन्यात खेळण्याची शक्यता कमी असल्याची माहिती मिळत आहे. मॅट हेन्री चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेतील सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा अंतिम सामनाचा थरार रविवारी ९ मार्च रोजी दुबई येथे रंगणार आहे.

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, न्यूझीलंड संघाचा कर्णधार मिशेल सँटनेरने मॅट हेन्रीच्या अंतिम सामन्यासाठी उपलब्धतेबद्दल आशा व्यक्त केली आहे. अंतिम सामन्यापूर्वी हेन्रीला तीन दिवसांची विश्रांती मिळाली आहे. याशिवाय, दुखापत झाल्यानंतर हेन्री नेट ट्रेनिंग दरम्यान केवळ क्षेत्ररक्षणाला आला नाही तर त्याने गोलंदाजी देखील केली.

झेल घेताना मॅट हेन्रीला दुखापत

लाहोरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उपांत्य सामन्यात हेनरिक क्लासेनचा झेल घेताना ३३ वर्षीय मॅट हेन्रीला खांद्याला दुखापत झाली. शुक्रवारी दुबईमध्ये माध्यमांशी बोलताना न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टीड म्हणाले की, हेन्रीच्या उपलब्धतेबद्दल काहीही माहिती नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या उपांत्य सामन्यात क्षेत्ररक्षण करताना त्याला खांद्याला दुखापत झाली होती.

न्यूझीलंड संघासाठी मोठा धक्का

हेन्रीची अनुपस्थिती न्यूझीलंड संघासाठी मोठा धक्का असेल. कारण, मॅट हेन्री चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेतील सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक स्टीड म्हणाले, 'आम्ही त्याचे काही स्कॅन आणि इतर गोष्टी केल्या आहेत आणि आम्ही त्याला या सामन्यात खेळण्याची प्रत्येक संधी देणार आहोत. आमच्या दृष्टिकोनातून सकारात्मक गोष्ट म्हणजे तो पुन्हा गोलंदाजी करण्यासाठी मैदानात आला, त्याच्या खांद्याच्या टोकावर पडल्याने त्याला नक्कीच खूप वेदना होत आहेत आशा आहे की तो बरा होईल. अद्याप काहीही सांगता येत नाही'.

टीम इंडियासाठी खूशखबर

२०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यापूर्वी न्यूझीलंडसाठी वाईट बातमी आहे, तर भारतीय संघासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण हेन्रीने चार सामन्यात १० बळी घेऊन सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या यादीत तो पहिल्या क्रमाकांवर आहे.

२०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये हेन्रीने घेतलेल्या १० पैकी पाच विकेट्स भारताविरुद्धच्या गट सामन्यात घेतल्या. २ मार्च रोजी खेळल्या गेलेल्या सामन्यात त्याने शुभमन गिल, विराट कोहली, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमी यांना बाद केले होते. जर मॅट हेन्री भारताविरुद्धच्या अंतिम सामन्यासाठी उपलब्ध नसेल तर त्याच्या जागी जेकब डफीला संघात समाविष्ट केले जाऊ शकते. जेकबने २०२२ मध्ये न्यूझीलंडकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathwada Politics : काँग्रेसला जोरदार धक्का, २ दिग्गज नेत्यांनी 'हात' सोडला, २४ तासांत कमळ हातात घेणार

Maharashtra Live News Update: पुण्यात कंटेनरला भीषण आग

PM Vishwakarma Yojana: कोणत्याही गॅरंटीशिवाय मिळणार ३ लाखांचे लोन; PM विश्वकर्मा योजना आहे तरी काय?

तिच्या स्टेप्सना तोड नाही! तरुणीचा नादखुळा डान्स पाहिला का?;VIDEO व्हायरल

Hans Mahapurush Rajyog: 12 वर्षांनंतर गुरु वक्री होऊन बनवणार हंस महापुरुष राजयोग, 'या' राशींच्या घरी होणार पैशांचा पाऊस

SCROLL FOR NEXT