मुंबई इंडियन्स इंडियनची गाडी प्रीमियर लीग २०२५ मध्ये रूळावर येण्यासाठी टीम पूर्ण प्रयत्न करेतय. पाच वेळा चॅम्पियन असलेल्या मुंबईने आतापर्यंत चारपैकी तीन सामने गमावले आहेत. तर आज मुंबईचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे. दरम्यान मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी अशी आहे. ही बातमी म्हणजे स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहचं टीममध्ये कमबॅक झालं आहे.
गेल्या ३ सामन्यांमध्ये मुंबईच्या फलंदाजांची कामगिरी काही खास राहिलेली नाही. गुडघ्याच्या दुखापतीमुळे रोहित लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात तो बाहेर बसला होता. त्यामुळे एक सामना गमावल्यानंतर आरसीबीविरुद्धच्या सामन्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त होईल की नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रोहित शर्माने नेट्समध्ये फलंदाजी केल्यानंतरच त्याला संधी द्यायची की नाही हे ठरवण्यात येणार आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) कडे अनेक उत्तम फलंदाज आहेत. गेल्या ३ सामन्यात २ विजय मिळवणाऱ्या आरसीबीसाठी ओपनर फिलिप सॉल्ट, विराट कोहली आणि कर्णधार रजत पाटीदार यांनी प्रत्येकी एक अर्धशतक झळकावलंय. गुजरातविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात आरसीबीची टॉप ऑर्डर पूर्णपणे अपयशी ठरली. त्यानंतर मिडल ऑर्डरमध्ये लियाम लिव्हिंगस्टोनने अर्धशतक झळकावलं होतं. अशावेळी आरसीबीचे स्टार फलंदाज मुंबईच्या गोलंदाजांचा कसा सामना करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे.
रायन रिकेल्टन (विकेटकीपर), रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, विल जॅक्स, हार्दिक पांड्या (कर्णधार), मिचेल सँटनर, जसप्रीत बुमराह, विघ्नेश पुथूर, ट्रेंट बोल्ट, दीपक चहर.
फिलिप सॉल्ट, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (विकेटकीपर), टिम डेव्हिड, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, जोश हेजलवुड, यश दयाल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.