Pele Passes Away  Saam Tv
Sports

Pele Passes Away : क्रीडा विश्वावर शोककळा; ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांचं निधन

क्रिडा विश्वातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांचं निधन झालं आहे.

साम टिव्ही ब्युरो

Pele Death News : क्रिडा विश्वातून एक दु:खद बातमी समोर आली आहे. महान फुटबॉलपटू पेले यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. पेले यांनी तीनवेळा ब्राझील संघाला फिफा विश्वचषक जिंकून दिला होता. १९५८, १९६२ आणि १९७० च्या फिफा विश्वचषक जिंकण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या निधनाने क्रीडा विश्वावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.  (Latest Marathi News)

गेल्या काही वर्षापासून ते कॅन्सरशी लढा देत होते. त्यांच्यावर साओ पाउलोच्या अलबर्ट आइन्स्टाइन रुग्णालयात उपचार सुरू होते.  पेले यांच्या मुलीने इन्स्टाग्राम पोष्ट लिहून त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे.

पेले यांना नियमीत तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण त्यांची प्रकृती बिघडत गेली. सप्टेंबर २०२१ मध्ये त्यांच्या शरीरातील कोलोन ट्यूमर हटवण्यात आला. त्यानंतर कीमो थेरेपी करण्यात आली होती.

याआधी ते अनेकदा रुग्णालयात दाखल झाले होते. पेले यांना हदया संदर्भातील आजार होता. कीमो थेरेपी उपचाराचा काही परिणाम होताना दिसत नव्हता. पेले या नावाने प्रसिद्ध असलेले एडसन अरांतेस डो नासिमेंटो यांचा जन्म २३ ऑक्टोबर १९४० रोजी ब्राझीलच्या मिनास गेराइस राज्यातील ट्रेस कोराकोस येथे झाला. 

१९५८ मध्ये ब्राझीलच्या पहिल्या फिफा विश्वचषक विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच किशोरवयीन असलेल्या पेले यांनी फ्रान्सविरुद्धच्या उपांत्य फेरीत हॅट्ट्रिक केली होती.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Syed Mushtaq Ali Trophy: ऐन सामन्यात यशस्वी जैस्वालची तब्येत अचानक बिघडली, पिंपरी-चिंचवडमधील रुग्णालयात दाखल

डोंबिवली स्कायवॉकवर फेरीवाल्यांचा अतिक्रमणाचा विळखा; रेल्वे प्रवाशांची वाट काढताना दमछाक

Thursday Horoscope : अचानक धनलाभ होईल, कुटुंबातील सदस्य खूश होतील; ५ राशींच्या लोकांच्या मनासारख्या घटना घडतील

IND vs SA 4th T20I: भारतविरुद्ध दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यात धुक्याचा खोडा; चौथा टी२० सामना रद्द

T2O वर्ल्डकप आधीच टीम इंडियाला मोठा झटका; प्रमुख खेळाडू संघाबाहेर, कारण काय?

SCROLL FOR NEXT