Rishabh Pant: ऋषभ पंतचा संघात परतीचा प्रवास कठीण? बीसीसीआयने स्पष्टच सांगितलं

हार्दिक पांड्या टी-20 मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे तर रोहित शर्मा वनडेमध्ये टीम इंडियाचा कर्णधार असणार आहे.
Rishabh Pant/File Photo
Rishabh Pant/File Photosaam tv
Published On

Rishabh Pant: बीसीसीआय टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतला मोठा धक्का दिला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियात त्याला वगळण्यात आलं आहे. ऋषभ पंत एकदिवसीय किंवा टी-20 मालिकेचा दोन्हीचा भाग नाही. हार्दिक पांड्या टी-20 मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे तर रोहित शर्मा वनडेमध्ये टीम इंडियाचा कर्णधार असणार आहे.

बीसीसीआयने आता ऋषभ पंतला स्पष्ट मेसेज दिला आहे. पंतला त्याच्या फिटनेसवर काम करावे लागेल, असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. तो फिट नसेल तर त्याचे संघात पुनरागमन कठीण होईल. भारतीय यष्टीरक्षक ऋषभ पंतसाठी हा संदेश मोठा आणि स्पष्ट आहे . फिटनेसवर काम करा किंवा संघातून वगळले जाणार, असं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे.  ( Indian Cricket Team)

Rishabh Pant/File Photo
Ind Vs SL: ज्याच्या फटकेबाजीची तुलना थेट सेहवागशी व्हायची, त्यालाच संघातून डच्चू; 'या' खेळाडूच्या करिअरला लागले ग्रहण?

ऋषभ पंतला सध्या बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (एनसीए) रिपोर्ट करण्यास सांगितले आहे. यावर्षी वनडे, टी 20 मध्ये ऋषभ त्याच्या फॉर्मशी झगडताना दिसला. त्यात आता गुडघा आणि पाठीच्या दुखापतींमुळे तो त्याच्या फिटनेसशीही संघर्ष करत आहे.

निवडकर्त्यांनी त्याला भारत आणि श्रीलंका मालिकेसाठी संधीही दिली नाही. त्याऐवजी त्याला एनसीएमध्ये कठोर परिश्रम करण्यास सांगितले आहे.

Rishabh Pant/File Photo
Rishabh Pant : रिषभ पंतबाबत महत्वाचा निर्णय; BCCIचा मोठा प्लान आला समोर

बीसीसीआयच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याचा हवाला देत इनसाइड स्पोर्टने अहवालात म्हटले आहे की, 'नक्कीच पंत अव्वल दर्जाचा खेळाडू आहे. पण दुर्दैवाने यावर्षी त्याचा फॉर्म वनडे आणि टी-20 या दोन्हींमध्ये निराशाजनक राहिला आहे. तो विकेटकीपर फलंदाज म्हणून अधिक तंदुरुस्त आणि चपळ असावा अशी कोचिंग स्टाफची इच्छा आहे. त्याला एनसीएमध्ये प्रशिक्षण घेण्यास सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com