virat kohli twitter
Sports

T20 WC 2024: वर्ल्डकप चॅम्पियन्सवर होणार पैशांचा वर्षाव! विराटसह या 3 खेळाडूंची ब्रँड व्हॅल्यू कोट्यवधींनी वाढणार

Indian Players Brand Value: भारतीय संघाच्या विजयानंतर खेळाडूंच्या थांबलेल्या डिल्स आता पूर्ण होणार आहेत.

Ankush Dhavre

भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत शानदार कामगिरी केली. यासह फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्डकपच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. दरम्यान या विजयाचा फायदा भारतीय खेळाडूंना जाहिरातीतही होणार आहे. असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, आतापर्यंत ज्या डील पूर्ण होऊ शकल्या नव्हत्या.

त्या आता मार्गी लागणार आहेत. यासह खेळाडूंच्या ब्रँड व्हॅल्यूमध्येही झपाट्याने वाढ होणार आहे. भारतीय आघाडीची मार्केटिंग एजेन्सी राईज वर्ल्डवाईड ही जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा,सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या यांच्या जाहिरातीचं कामकाज पाहते. टी -२० वर्ल्डकपपूर्वी या कंपनीने १० मोठ्या ब्रँड्ससोबत डील साइन केली होती. येणाऱ्या काही दिवसात हा आकडा वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

भारताचे हे ४ स्टार खेळाडू ३५ ते ४० कॅटेगरीच्या ८९ ब्रँड्सच्या जाहिराती करतात. ज्यात ऑडीयो, न्यूट्रीशन, ऑटो, फिटनेस अॅप आणि इंश्योरंसारख्या कॅटेगरीचा समावेश आहे. वर्ल्डकपला रवाना होण्यापूर्वी या कंपनीने काही ब्रँड्ससोबत चर्चा केली होती. आता हे चारही खेळाडू वर्ल्ड चॅम्पियन झाले आहेत. आता या डिलमध्ये ठरवली जाणार रक्कम ही खेळाडूंच्या ब्रँड व्हॅल्यूनुसार ठरवली जाणार असल्याचं, कंपनीचे प्रमुख निखील बार्डीया यांनी सांगितलं.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना एका डिलसाठी ३.५ ते ७ कोटी रुपये दिले जातात. तर जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्यासारखे खेळाडूंना प्रत्येक डिलसाठी २ ते ३ कोटी रुपये घेतात. याबाबत बोलताना निखिल बार्डिया म्हणाले की, ' क्रिकेट आणि क्रिकेटर यांची व्हॅल्यू कधीच कमी होत नाही. त्यांची ब्रँड व्हॅल्यू तशीच राहते कारण, दरवर्षी आयसीसीचा इव्हेंट होतो. यासह आयपीएल स्पर्धेचे आयोजनही केले जाते.'

आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील विजयाचा फायदा हा फलंदाजांना जास्त होणार आहे. २०११ आणि २०२३ च्या तुलनेत गोलंदाजांपेक्षा फलंदाजांना अधिक फायदा झाला आहे. मात्र यावेळी यात बदल होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. कारण गोलंदाजांनीही शानदार कामगिरी केली आहे. आता खेळाडूंना मॅनेज करणाऱ्या कंपन्या खेळाडूंना किती फायदा करुन देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची शेवटची आरती संपन्न

ITR Filling: आयटीआर फाइल करण्याची डेडलाइन वाढण्याची शक्यता, आतापर्यंत फक्त ४.५६ कोटी करदात्यांनी केलाय अर्ज

Ganesh Visarjan 2025: बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूकीत पायांची काळजी कशी घ्याल? हे उपाय करतील तुमची मदत

Baaghi 4 OTT Release : जबरदस्त ॲक्शन अन् रोमान्सचा धमाका, टायगर श्रॉफचा 'बागी ४' कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येणार?

Ganpati Visarjan : पुण्यात गणपती विसर्जनावेळी दुर्घटना, मिरवणुकीदरम्यान दोन जणांना विजेचा शॉक

SCROLL FOR NEXT