Rohit sharma Saam tv
क्रीडा

IND VS AUS 3rd test: लाजिरवाण्या पराभवानंतर रोहितने 'या' खेळाडूवर फोडलं पराभवाचं खापर

इंदूरच्या मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने जोरदार कमबॅक करत ९ गडी राखून विजय मिळवला आहे

Ankush Dhavre

Ind vs Aus 3rd test Rohit sharma statement: नुकताच भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना पार पडला. इंदूरच्या मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने जोरदार कमबॅक करत ९ गडी राखून विजय मिळवला आहे. यासह मालिकेतही २-१ ने कमबॅक केलं आहे. हा सामना गमावल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा काय म्हणाला चला पाहूया.(Latest sports updates)

या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्याचा हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला. कारण भारतीय फलंदाजांना पहिल्या डावात हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघाचा डाव १०९ धावांवर संपुष्ठात आला होता. तर दुसरा डाव अवघ्या १६३ धावांवर संपुष्ठात आला होता.

सामना झाल्यानंतर काय म्हणाला रोहित शर्मा?

हा सामना झाल्यांनतर रोहित शर्माने भारतीय संघातील फलंदाजांना कारणीभूत ठरवले आहे. सामना झाल्यानंतर त्याने म्हटले की , 'आम्ही पहिल्या डावात चांगली फलंदाजी करू शकलो नव्हतो.' जर भारतीय संघाने पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारली असती. तर नक्कीच या कसोटी सामन्यात भारतीय संघ आघाडी घेऊ शकला असता.

दुसऱ्या डावातही भारतीय फलंदाज सुपरफ्लॉप..

पहिल्या डावात फ्लॉप ठरलेले भारतीय फलंदाज दुसऱ्या डावात कमबॅक करतील,असे वाटत होते. मात्र दुसऱ्या डावातही भारतीय फलंदाजांना सुर गवसला नाही. एकट्या पुजाराला वगळता इतर कुठल्याही फलंदाजाला फलंदाजीत योगदान देता आले नाही.

श्रेयस अय्यरने २६ धावांची खेळी केली. तर अक्षर पटेल १५ धावांवर नाबाद राहिला. भारताचा दुसरा डाव ६० षटकअखेर १६३ धावांवर संपुष्टात आला.

ऑस्ट्रेलियाने मिळवला ९ गडी राखून विजय

हा सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलिया संघाला केवळ ७६ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना, ऑस्ट्रेलिया संघाकडून ट्रेविस हेडने ४९ धावांची खेळी केली. तर लाबुशेनने २८ धावांचे योगदान दिले. हा सामना ऑस्ट्रेलिया संघाने ९ गडी राखून आपल्या नावावर केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: बीड जिल्ह्यात कोण जिंकलं? वाचा एका क्लिकवर

Sambhajinagar News : संभाजीनगरमध्ये राडा, पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज, पाहा Video

Longest River In Maharashtra: महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती? पवित्र तीर्थस्थान म्हणून ओळख

Vidhan Sabha Election Result : रायगड जिल्ह्यात महायुतीची सरशी; महाविकास आघाडीच्या हाती भोपळा

Maharashtra Election Result: उल्हासनगरात राष्ट्रवादीला जबर धक्का! भाजपच्या कुमार आयलानींचा मोठा विजय

SCROLL FOR NEXT