team india twitter
Sports

Team India: भारतीय क्रिकेटमधील 'काळा दिवस', एकाच दिवशी घडल्या ३ मोठ्या घटना

Team India Lost 3 Matches In Single Day: भारतीय संघासाठी रविवारचा दिवस काळा दिवस ठरला आहे. कारण या दिवशी भारतीय संघाला ३ सामने गमवावे लागले आहेत.

Ankush Dhavre

रविवार (८ डिसेंबर) हा भारतीय संघासाठी सुपरफ्लॉप रविवार ठरला. यादिवशी भारतीय संघ ३ सामने खेळण्यासाठी मैदानात उतरला, मात्र एकही सामना जिंकता आलेला नाही. भारतीय पुरुष संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध पिंक बॉल कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता.

तर दुसरीकडे भारताचा महिला संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसरा वनडे सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. तर अंडर १९ संघ बांगलादेशविरुद्ध अंडर १९ एशिया कप स्पर्धेची फायनल खेळण्यासाठी मैदानात उतरला होता.

मात्र या तिन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी हा दिवस काळा दिवस ठरला आहे.

एकाच दिवशी गमावले ३ सामने

भारतीय महिला संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघ

भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलियन महिला संघात दुसऱ्या वनडे सामन्याचा थरार रंगला. हा सामना ब्रिस्बेनमध्ये पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटक अखेर ३७१ धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला ४४.५ षटकात १४९ धावा करता आल्या. ऑस्ट्रेलियाने हा सामना १२२ धावांनी आपल्या नावावर केला.

बॉर्डर गावसकर ट्रॉफीत पराभव

दुसरीकडे बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील दुसरा कसोटी सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये पार पडला. हा डे नाईट कसोटी सामना होता. या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघ १८० धावांवर ऑल आऊट झाला.

या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने १५७ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाचा डाव अवघ्या १७५ वर आटोपला. ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकण्यासाठी अवघ्या १९ धावा करायच्या होत्या. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने सहज पूर्ण केलं.

अंडर १९ एशिया कप फायनल

अंडर १९ एशिया कप स्पर्धेतील फायनलमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकली आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम गोलंदाजी करताना भारतीय गोलंदाजांनी बांगलादेश १९८ धावांवर ऑल आऊट केलं. या धावांचा पाठलाग करताना भारताचा संघ १३९ धावांवर ऑल आऊट झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tesla Y Model Specification: टेस्लाचे सुपर फिचर्स आता भारतात, खास फिचर्स जाणून तुम्हीही व्हाल थक्क

सून बाथरूममध्ये आंघोळ करत होती, सासऱ्यानं मागून धरलं अन् बेडवर ढकललं; सासऱ्याचा खरा चेहरा समोर

Maharashtra Live News Update: साई चरणी सोन्याचा त्रिशुळ अर्पण, बहीण भावाकडून सुवर्णदान

CM Devendra Fadnavis: वरळी दहीहंडीतून फडणवीसांचा हल्ला; पापाची हंडी फुटली, विकासाची हंडी लागेल|VIDEO

Solapur News : एसीचा स्फोट आणि होत्याच नव्हतं झालं; सोलापुरात महिलेचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT