Kolkata knight riders twitter
Sports

KKR Captain: केकेआरचा कॅप्टन ठरला? या अनुभवी खेळाडूला मिळणार मोठी जबाबदारी?

Kolkata knight Riders Captain: आगामी आयपीएल २०२५ स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघाचं नेतृत्व कोण करणार? असा प्रश्न उपस्थित होत असताना, दिग्गज भारतीय खेळाडूचं नाव पुढे येत आहे.

Ankush Dhavre

आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी कोलकाता नाईट रायडर्सने मजबूत संघ निवडला आहे. मात्र कर्णधार कोण असेल , हे अजूनही ठरलेलं नाही. गेल्या हंगामात श्रेयस अय्यर या संघाचं नेतृत्व करताना दिसून आला होता.

त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलची ट्रॉफी उंचावली होती. मात्र या हंगामात कोलकाताने त्याला रिलीज करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर लिलावात त्याला खरेदी करता आलं नव्हतं. त्यामुळे कोलकाताचा संघ कर्णधाराच्या शोधात आहे.

सौदी अरेबियातील जेद्दाहमध्ये आयपीएल २०२५ स्पर्धेचा लिलाव सोहळा पार पडला. या लिलावात श्रेयस अय्यर हातून निघाला पण वेंकटेश अय्यरला कोलकाताने २३.७५ कोटींची बोली लावली आणि आपल्या संघात कायम ठेवलं.

तेव्हापासून वेंकटेश अय्यर कोलकाताचा कर्णधार होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र आता वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. माध्यमातील वृत्तानुसार, अजिंक्य रहाणे कोलकाता नाईट रायडर्स संघाचा पुढील कर्णधार होऊ शकतो. अजिंक्य रहाणेला या लिलावात १.५० कोटींच्या बेस प्राईजवर खरेदी केलं होतं.

अनुभवी कर्णधार

रहाणेला संघाचं नेतृत्व करण्याचा दांडगा अनुभव आहे. त्याने भारतीय संघाचं नेतृत्व करत संघाला विजय मिळवून दिला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने रणजी ट्रॉफी स्पर्धा जिंकली. यासह तो राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार देखील होता. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्सचा संघ रहाणेकडे नेतृत्वाची धुरा देण्याचा नक्कीच विचार करू शकतो.

एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, रहाणेकडे कर्णधारपद सोपवलं जाण्याची शक्यता ही ९० टक्के इतकी आहे. कर्णधारपदाचा पर्याय म्हणून रहाणेचा संघात समावेश करण्यात आला होता. त्यामुळे अजिंक्य रहाणे पुन्हा एकदा कर्णधाराच्या भूमिकेत दिसून येऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बुलढाण्यात ५ कोटी खर्चूनही गाव तहानलेली

विरोधी पक्षाला मोठा धक्का; माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीचा भाजपमध्ये प्रवेश, राजकीय समीकरण बदलणार

Face Care: क्लिन आणि सॉफ्ट स्किनसाठी पार्लर ट्रेटमेंटची काय गरज? घरीच हा फेसमास्क करेल सगळे पॉब्लेम दूर

नाशिक हादरलं! 'मजामस्ती'साठी पोलीस निरीक्षकाकडून गोळीबार?

Mumbai Crime: ४ किलोमीटरच्या प्रवासासाठी २००० रुपये उकळले, मुंबई एअरपोर्टबाहेर टॅक्सी चालकाकडून प्रवाशाची फसवणूक

SCROLL FOR NEXT