team-india saam tv news
Sports

Sourav Ganguly Statement: 'मी विराटला कर्णधारपदावरुन काढलं नव्हतं..',सौरव गांगुलीचा २ वर्षांनी मोठा खुलासा

Sourav Kohli On Virat Kohli Captaincy: आता २ वर्षांनंतर बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी विराट कोहलीच्या कर्णधार पदाबाबत मोठा खुलासा केला आहे.

Ankush Dhavre

Sourav Ganguly Statement On Virat Kohli Captaincy:

विराट कोहली हा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक आहे. त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने अनेक महत्वाच्या मालिकांमध्ये विजय मिळवला आहे. दरम्यान २०२१ टी-२० वर्ल्डकप झाल्यानंतर विराटने कर्णधारपद सोडलं होतं. दरम्यान आता २ वर्षांनंतर बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी विराट कोहलीच्या कर्णधार पदाबाबत मोठा खुलासा केला आहे.

सौरव गांगुली यांनी दादागिरी अनलिमिटेड या शोमध्ये याबाबत बोलताना खुलासा केला आहे. सौरव गांगुली म्हणाले की,' विराट कोहलीने टी-२० फॉरमॅटमध्ये कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. ज्यावेळी त्याने हा निर्णय घेतला त्यावेळी मी स्पष्ट केलं होतं की, वनडे आणि टी-२० फॉरमॅटसाठी वेगवेगळा कर्णधार असू शकत नाही. मी म्हटलं होतं की, जर तुला टी-२० फॉरमॅटचं कर्णधार सोडायचं असेल तर वनडे फॉरमॅटचं कर्णधारही सोडलं तर बरं होईल. कारण मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये २ वेगवेगळे कर्णधार नको होते.'

तसेच ते पुढे म्हणाले की,'मी विराटला समजावून सांगितलं की, मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये दोन वेगवेगळे कर्णधार ठेवता येणार नाहीत. त्यामुळे वनडे संघाचं कर्णधारपद सोडलं तर बरं होईल.' (Latest sports updates)

टी-२० वर्ल्डकप २०२१ स्पर्धेत पराभूत झाल्यानंतर विराट कोहलीने टी-२० संघाचं कर्णधारपद सोडलं होतं. डिसेंबर २०२१ मध्ये विराट कोहलीने वनडे संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता.

या निर्णयानंतर वाद देखील पेटला होता. दरम्यान जानेवारी २०२२ मध्ये विराट कोहलीने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असताना कसोटी संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. विराटने कर्णधारपद सोडल्यानंतर रोहित शर्माची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gairan Land: मनपा-नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवलं; सरकारचा मोठा निर्णय

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

SCROLL FOR NEXT