Virat Kohli Restaurant: विराटच्या रेस्टॉरंटमध्ये कपड्यांवरुन प्रवेश नाकारल्याने पेटला वाद; काय आहे प्रकरण? पाहा Video

Virat Kohli Latest News: सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. ज्यात असा दावा करण्यात आला आहे की, लुंगी घातल्यामुळे विराटच्या रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाकारला गेला. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घ्या.
 virat-kohli-restaurant-news
virat-kohli-restaurant-newstwitter
Published On

Virat Kohli Restaurant News:

भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चेत आहे. वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक धावा करत त्याने प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कार पटकावला होता. दरम्यान यावेळी तो आपल्या फलंदाजीमुळे नव्हे तर वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे.

विराट कोहलीच्या रेस्टॉरंटमध्ये जाण्यापासून एका तरुणाला रोखण्यात आलं आहे. हा प्रवेश त्या तरुणाने घातलेल्या कपड्यांमुळे नाकारण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. ज्यात असा दावा करण्यात आला आहे की, लुंगी घातल्यामुळे विराटच्या रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाकारला गेला. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घ्या.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यात एक तरुण पांढऱ्या रंगाची लुंगी आणि पांढऱ्या रंगाचं शर्ट घालून विराटच्या जुहू येथील वन ८ रेस्टॉरंटच्या बाहेर उभा असल्याचं दिसून येत आहे.

तो तरुण या व्हिडिओमध्ये म्हणतोय की, जुहू येथील जे डब्ल्यू मॅरियट हॉटेलमध्ये चेक इन केल्यानंतर मी विराटच्या वन ८ रेस्टॉरंटमध्ये आलो होतो. प्रसिद्ध ब्रँडचे कपडे घालूनही मला या रेस्टॉरंटमध्ये प्रवेश दिला गेला नाही. मी जे कपडे परिधान केले आहेत, ते हॉटेलच्या ड्रेस कोडमध्ये समाविष्ट नसल्याचं त्यांनी सांगितलं. प्रवेश न मिळाल्याने मी निराश होऊन हॉटेलकडे परतलो. ते या प्रकरणी कारवाई करतील की नाही माहीत नाही, पण आशा करतो की, अशी प्रकरणे पु्न्हा होणार नाही. मी तामिळ संस्कृतीचा पोशाख परिधान केला आहे. रेस्टॉरंट व्यवस्थापनाने संपूर्ण तामिळ समाजाचा आणि संस्कृतीचा अपमान केला आहे.' असं त्या तरुणानं म्हटलं आहे.

 virat-kohli-restaurant-news
IND vs AUS: नेमकं चुकलं तरी कुठं? विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियाच्या दारुण पराभवानंतर मॅथ्यू वेडने सांगितलं कारण

हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड होताच तुफान व्हायरल होऊ लागला आहे. तसेच नेटकरी देखील आपल्या प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत. एका युजरने लिहिलं की,'लाज वाटली पाहिजे, विराट कोहलीच्या रेस्टॉरंट व्यवस्थापनाने भारतीय पारंपारिक पोशाखांना परवानगी नाकारली आहे.' तर काहींनी या व्हिडिओतील तरुणावर प्रश्न उपस्थित केला आहे. अनेकांचं असं म्हणणं आहे की, हा तरुण कॅमेरा आणि माईक घेऊन पूर्ण तयारीनिशी आला आहे. आणखी एका युजरने आपलं वैयक्तिक मत व्यक्त करत म्हटलंय की,मला वाटतं की, ड्रेस कोडचं पालन व्हायलाच हवं.' (Latest sports updates)

 virat-kohli-restaurant-news
Suryakumar Yadav Statement: 'मी खेळाडूंना सांगितलं होतं की..', मालिका जिंकल्यानंतर सूर्यकुमार यादवचं मोठं वक्तव्य

आणखी एका युजरने थेट विराटला प्रश्न विचारत म्हटलं की, ' विराट आपल्याच संस्कृतीचा तिरस्कार कसा करु शकतो. विराटच्या वन ८ मध्ये हिजाब घातलेली स्त्री किंवा बिकिनी, क्रॉप टॉप घातलेल्या महिलेला परवानगी आहे. स्कलकॅप घातलेल्या पुरुषाला परवानगी आहे. मग पारंपारिक लुंगी घातलेल्या व्यक्तीला परवानगी का नाकारली? असा सवाल त्याने उपस्थित केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com