Sourav Ganguly News: वर्ल्डकप चॅम्पियन नव्हे; हे २ संघ टीम इंडियाला जड जातील; सौरव गांगुलीला सतावतेय वेगळीच भीती

Sourav Ganguly News: माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीने टीम इंडियाविषयी एक वेगळीच भीती व्यक्त केली आहे.
sourav ganguly, Cricket News, Asia XI, Team India
sourav ganguly, Cricket News, Asia XI, Team IndiaSaam Tv
Published On

Sourav Ganguly News:

क्रिकेट विश्वचषक स्पर्धा आता उपांत्य फेरीजवळ पोहोचली आहे. भारतात सुरु असलेल्या विश्वचषकात चार संघ उपांत्य फेरीत पोहोचणार आहेत. या स्पर्धेतील अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी सर्वच क्रिकेट संघ कसून प्रयत्न करताना दिसत आहे. याचदरम्यान, माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीने टीम इंडियाविषयी एक वेगळीच भीती व्यक्त केली आहे. (Latest Marathi News)

विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिका त्यांचा उत्कृष्ट खेळ दाखवताना दिसत आहे. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाही गेल्या काही सामन्यात कमबॅक करत मोठा विजय मिळवताना दिसत आहे.

दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ विरोधी संघावर चांगलीच चाल करताना दिसत आहे. दोन्ही संघाने चांगला खेळ करत या स्पर्धेच्या क्रमवारीत पहिल्या चारमध्ये स्थान मिळवलं आहे. याचदरम्यान, सौरव गांगुलीने भारतीय क्रिकेट टीमला सजग केलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

sourav ganguly, Cricket News, Asia XI, Team India
NED vs BAN: नेदरलँडचा मोठा विजय, ८७ धावांच्या फरकाने बांगलादेशला नमवलं

सौरव गांगुली म्हणाला, 'ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघाचं टीम इंडियासाठी मोठं आव्हान असणार आहे. शनिवारच्या बांगलादेश विरुद्ध नेदरलँड्स सामन्यावेळी सौरव गांगुली दोन्ही संघावर मोठं भाष्य केलंय.

'या दोन्ही संघांनी चांगलं कमबॅक केलं आहे. दोन्ही संघ सामन्यात चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. त्यात आजचा ऑस्ट्रेलियाचा विजय खरोखरंच रोमहर्षक होता, असंही गांगुली पुढे म्हणाला.

गांगुलीने इंग्लंडच्या खराब कामगिरीवरही आश्चर्य व्यक्त केलं. इंग्लंड संघाने विश्वचषकात आतापर्यंत पाच पैकी केवळ एकच सामना जिंकला आहे. त्यात इंग्लंडचा पुढील सामना भारतासोबत लखनऊमध्ये होणार आहे.

याच इंग्लंड संघाच्या कामगिरीवर गांगुली म्हणाला की, 'मी विचारही केला नव्हता की, इंग्लंडचा संघ अशा प्रकारची खराब कामगिरी करेल'.

sourav ganguly, Cricket News, Asia XI, Team India
AUS vs NZ : नीशमच्या प्रयत्नांना अपयश, रोमहर्षक सामन्यात ऑस्ट्रेलियाची न्यूझीलंडवर मात

'विश्वचषकात भारतीय संघाची स्थिती भक्कम असल्याचं दिसून येत आहे. पण चॅम्पियन होणं खूप दूर आहे. पण त्याआधी टीम इंडियाला बाद फेरीमध्ये चांगली खेळी अपेक्षित आहे, असंही गांगुली पुढे म्हणाला.

त्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या संघाबाहेर आहे. याविषयी गांगुली म्हणाला, 'तो चांगला खेळाडू आहे. पण तरीही सध्या टीम इंडिया मजबूत आहे.

sourav ganguly, Cricket News, Asia XI, Team India
Team India, Playing XI: इंग्लंडविरुद्ध प्लेइंग ११ ठरली! गेल्या सामन्यातील 'हिरो'बसणार बाहेर; दिग्गज गोलंदाजाचं होणार कमबॅक

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com