r ashwin  twitter
Sports

IND vs ENG 3rd Test: ना नो, ना वाईड; तरीही एकही चेंडू न टाकता इंग्लंडला मिळाल्या ५ धावा, वाचा कसं?

R Ashwin Big Mistake: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमधील पाचवा कसोटी सामना राजकोटच्या निरंजन शहा मैदानावर सुरु आहे. या सामन्यात आर अश्विनच्या एका चुकीमुळे भारतीय संघाचं मोठं नुकसान झालं आहे.

Ankush Dhavre

R Ashwin Mistake, India vs England 3rd Test:

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमधील पाचवा कसोटी सामना राजकोटच्या निरंजन शहा मैदानावर सुरु आहे. या सामन्यात आर अश्विनच्या एका चुकीमुळे भारतीय संघाचं मोठं नुकसान झालं आहे. फलंदाजी करत असताना आर अश्विन चुकून खेळपट्टीवरुन धावला. या चुकीमुळे अंपायरने भारतीय संघाला ५ धावांची पेनल्टी दिली आहे. आता इंग्लंडचा संघ पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी येणार त्यावेळी त्यांची धावसंख्या ५-० अशी असेल.

अश्विनची एक चूक भारतीय संघाला महागात पडणार?

ही घटना सामन्यातील १०२ व्या षटकात घडली. तर झाले असे की, भारतीय संघाची फलंदाजी सुरु असताना इंग्लंडकडून १०२ वे षटक टाकण्यासाठी रेहान अहमद गोलंदाजीला आला होता. या षटकातील चौथ्या चेंडूवर आर अश्विनने ऑफ साईडच्या दिशेने चेंडू ढकलला आणि १ धाव घेण्यासाठी धावला. (Cricket news in marathi)

मात्र धाव घेत असताना अश्विनकडून मोठी चूक झाली. तो डेंजर झोनमध्ये धावताना दिसून आला. दरम्यान ही बाब अंपायरच्या लक्षात येताच भारतीय संघावर ५ धावांची पेनल्टी लावली आहे. या डावात रविंद्र जडेजाही खेळपट्टीच्या मधून धावला होता. त्यामुळे आर अश्विनला वॉर्निंग दिली गेली होती. मात्र आता अश्विननेही तिच चूक केली आहे, त्यामुळे भारतीय संघावर ही कारवाई करण्यात आली आहे.

काय सांगतो नियम?

क्रिकेटच्या नियमानुसार, जर खेळाडू पहिल्यांदा चुकून खेळपट्टीवरुन धावला तर अंपायरकडून त्याला वॉर्निंग दिली जाते. मात्र हीच चूक जर त्याने दुसऱ्यांदा केली. तर विरोधी संघाला ५ धावा पेनल्टी स्वरुपात दिल्या जातात. भारतीय संघाकडून ही चूक दुसऱ्यांदा झाली त्यामुळे पेनल्टी स्वरुपात इंग्लंडला पाच धावा देण्यात आल्या आहेत.

असं असलं तरी देखील भारतीय संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना धावांचा डोंगर उभारला आहे. रोहित शर्मा, रविंद्र जडेजाच्या शतकी आणि सरफराज खानच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारतीय संघाने पहिल्या डावात ४०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navi Mumbai: नवी मुंबईत भाजपचा स्वबळाचा नारा? महापौर आमचाच होणार, गणेश नाईकांचा दावा

Sunday Mega Block : रविवारी मुंबईकरांचे 'मेगा'हाल होणार, ३ मार्गावर मेगाब्लॉक, जाणून घ्या रेल्वेचे वेळापत्रक

Maharashtra Live News Update : अंबरनाथमध्ये मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप

Nagarparishad Election: बारामती, फलटण, अंबरनाथसह २३ नगरपरिषद- नगरपंचायतीसाठी आज मतदान, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; उद्या निकाल

Municipal Election : अंबरनाथमध्ये शिंदेंचे बोगस मतदार, मंगल कार्यालयात शेकडो महिला आढळल्या, भाजप-काँग्रेसचा आरोप

SCROLL FOR NEXT