paris olympics  yandex
क्रीडा

Paris Paralympic 2024: भारताला मोठा धक्का! टोकियो गोल्ड मेडलिस्ट खेळाडूवर 18 महिन्यांचा बॅन

Ankush Dhavre

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धा नुकताच संपन्न झाली आहे. येत्या २८ ऑगस्टपासून पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. दरम्यान ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच भारताला मोठा धक्का बसला आहे.

टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणारा बॅडमिंटनपटू प्रमोद भगतने डोपिंगच्या नियमांचं उल्लंघन केलं आहे. त्यामुळे त्याच्यावर १८ महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे तो आगामी पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेला मुकणार आहे.

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेला येत्या २८ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने आपल्या प्रेस रिलीजमध्ये म्हटले की, 'टोकियो पॅरालिम्पिक सुवर्ण पदक विजेत्या प्रमोद भगतला १८ महिन्यांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. तो पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ स्पर्धेत सहभाग घेऊ शकणार नाही.

प्रमोद भगतने बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या नियमांचं उल्लंघन केलं आहे. त्यामुळे ही कारवाई केली जात असल्याचं म्हटलं जात आहे. १ मार्च २०२४ रोजी CAS च्या डोपिंग विरोधी पथकाने पाहणी केली असता, प्रमोद भगत गेल्या १२ महिन्यात ३ वेळा डोपिंग चाचणीत फेल झाल्याची माहिती समोर आली आहे.

त्यानंतर त्याने CAS च्या अपील डिव्हिजनकडे दाद मागितली. मात्र २९ जुलै २०२४ रोजी CAS च्या अपील डिव्हिजनने ही मागणी फेटाळून लावली. त्यामुळे त्याचा अपात्रतेचा कालावधी सुरु झाला असून तो पुढील १८ महिने खेळू शकणार नाहीये. तो SL3 गटातून बॅडमिंटन खेळतो. मात्र यावेळी तो भारताचं प्रतिनिधित्व करु शकणार नाहीये.

प्रमेाद भगतच्या नावे टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावण्याची नोंद आहे. तो बिहारमधील वैशाली जिल्ह्यात राहतो. तो पॅरा बॅडमिंटन प्रकारातील SL3 गटात जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT