Chennai Super Kings Appointed Ruturaj Gaikwad as a Captain of Team Yandex
Sports

CSK New Captain: धोनीचा वारसदार ठरला! मराठमोळा ऋतुराज बनला CSKचा कर्णधार

Ruturaj Gaikwad Become a Captain Of Chennai Super Kings: आयपीएल २०२४ स्पर्धेतील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे

Ankush Dhavre

Ruturaj Gaikwad Become Captain Of CSK:

आयपीएल २०२४ स्पर्धेतील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. या सामन्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्ज संघात मोठा बदल करण्यात आला आहे. मराठमोळा ऋतुराज गायकवाड (Ruturaj gaikwad) चेन्नई सुपर किंग्ज संघाचा नवा कर्णधार बनला आहे. (CSK Captaincy)

एमएस धोनी (MS Dhoni) हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे .त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने आयसीसी टी-२० वर्ल्डकप, आयसीसी वनडे वर्ल्डकप आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केल्यानंतर तो केवळ आयपीएल स्पर्धेत झळकत होता.

आपल्या नेतृत्वाखाली त्याने चेन्नई सुपर किंग्ज संघाला ५ वेळेस चॅम्पियन बनवलं आहे. गेल्या २-३ वर्षांपासून धोनी आयपीएलला रामराम करणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. मात्र हंगाम सुरु होण्यापूर्वीच त्याने कर्णधारपदावरुन माघार घेतली आहे. त्यामुळे हा त्याचा शेवटचा हंगाम असेल हे जवळ जवळ निश्चित झाले आहे. (Cricket news in marathi)

आयपीएल २०२४ स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर सर्व कर्णधारांचसह ट्रॉफी फोटोशूट झालं. यावेळी सर्व १० कर्णधार उपस्थित होते. कर्णधार म्हणून हे धोनीचं शेवटचं हंगाम असेल अशी चर्चा सुरु होती. मात्र धोनीऐवजी ऋतुराजला पाहुन क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. धोनीऐवजी ऋतुराज गायकवाड संघाचं नेतृत्व करेल अशी पोस्ट चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच एमएस धोनीने एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात त्याने नव्या रोलचा उल्लेख केला होता. या निर्णयानंतर त्याचा नवा रोल काय होता हे स्पष्ट झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Happy Ganesh Chaturthi 2025 Wishes : गणपती बाप्पा मोरया! गणेश चतुर्थीनिमित्त प्रियजनांना पाठवा या खास शुभेच्छा

Crime News: पतीच्या दीर्घायुष्यासाठी पत्नीचा उपवास; अंडा करीसाठी नकार देताच नवऱ्याची मती खुंटली, अन्...

BCCI चं १२५ कोटी रुपयांचं नुकसान; Dream ११ नंतर आणखी एका कंपनीने साथ सोडली?

Gautam Gaikwad: सिंहगडावरून तरुण बेपत्ता कसा झाला? ५ दिवसांत काय-काय घडलं, गौतम गायकवाडने सांगितला थरारक किस्सा

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंना धक्का, बड्या नेत्याचा राजीनामा; शिंदे गटात जाणार

SCROLL FOR NEXT