CSK vs RCB saam tv
Sports

CSK vs RCB : CSK ला मोठा धक्का; मॅचविनर खेळाडू RCB विरूद्ध बाहेर, पाहा दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग 11

CSK vs RCB IPL 2025: या वर्षीच्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जने दमदार सुरुवात केली. पहिल्या लढतीत चेन्नईने मुंबई इंडियन्सला धूळ चारली. आता आज चेन्नईचा दुसरा सामना होणार आहे. हा सामना रॉयल चॅलेंजर बंगळूरूविरुद्ध रंगणार आहे. पण या सामन्याआधी चेन्नईच्या संघासाठी एक निराशाजनक बातमी पुढे आली आहे.

Surabhi Jayashree Jagdish

यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जची सुरुवात चांगली झाली. पहिल्या सामन्यात चेन्नईने मुंबई इंडियन्सचा पराभव केला. तर आज चेन्नईचा दुसरा सामना रंगणार आहे. आजचा सामना रॉयल चॅलेंजर बंगळूरूशी होणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी चेन्नईच्या चाहत्यांसाठी आणि टीमसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.

धोकादायक गोलंदाज अनफीट

श्रीलंकेचा उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज मथिशा पाथिराणा मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात खेळू शकला नाही. गेल्या सिझनमध्ये त्याच्या उत्कृष्ट कामगिरीनंतर, या स्टार वेगवान गोलंदाजाला चेन्नईने आयपीएल २०२५ साठी १३ कोटी रुपयांना रिटेन केलं होतं. मात्र या सिझनच्या सुरुवातीपासूनच हा गोलंदाज दुखापतींनी त्रस्त आहे. याशिवाय २०२४ च्या आयपीएलमधील शेवटच्या काही सामन्यांनाही मुकला होता.

चेन्नई सुपर किंग्जचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी आरसीबीविरुद्धच्या सामन्यापूर्वी खुलासा केला की, पाथिराना त्याच्या दुखापतीतून बरा होतोय. परंतु तो आरसीबीविरुद्ध खेळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे चेन्नईच्या टीमसाठी हा मोठा धक्का मानला जातोय.

सुरेश रैनाने चेन्नईच्या मुंबई विरुद्धच्या सामन्यादरम्यान सांगितलं होतं की, श्रीलंकेचा खेळाडू जखमी झाला आहे. गेल्या सिझनमध्ये चेन्नईसाठी पाथिरानाने उत्तम कामगिरी केली होती, परंतु २०२४ च्या आयपीएलमध्ये हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे त्याला टीमबाहेर जावं लागलं. त्यामुळे आता पाथिराणा फीट होऊन कधी टीममध्ये परतणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

भुवनेश्वर कुमारला मिळणार का आज संधी?

कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात दुखापतीमुळे खेळू न शकलेला वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या तंदुरुस्तीवरही टीम लक्ष ठेवून आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज तंदुरुस्त झाल्यास त्याला रसिक सलामच्या जागी प्लेईंग ११ मध्ये स्थान मिळेल का हे पाहणं महत्त्वाचं आहे.

कशी असेल दोन्ही टीम्सनची प्लेईंग ११

चेन्नई सुपर किंग्ज: ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, सॅम करन, एमएस धोनी (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, नूर अहमद, नॅथन एलिस/मथिशा पाथिराना आणि खलील अहमद.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: विराट कोहली, फिल सॉल्ट (विकेटकीपर), रजत पाटीदार (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा, टिम डेव्हिड, कृणाल पंड्या, रसिक दार सलाम/भुवनेश्वर कुमार, सुयश शर्मा, जॉश हेजलवुड, यश दयाल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ड्रम निळ्या रंगाचाच का असतो?

Lip Care: हायड्रेशनच्या कमीमुळे ओठ काळे पडले आहे का? मग करा 'हे' घरगुती उपाय

Raju Shetti : पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी; राजू शेट्टी यांचे आंदोलन, पांडुरंगाला घातले साकडे

Maharashtra Live News Update: बोरिवली पूर्वेतील एसआरए प्रकल्पात भीषण आग

Dhiraj Deshmukh: माजी मुख्यमंत्र्यांच्या धाकट्या मुलाचं शिक्षण किती?

SCROLL FOR NEXT