team india yandex
क्रीडा

Saurabh Tiwary Retired: राजकोट कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडूची निवृत्तीची घोषणा

Ankush Dhavre

Saurabh Tiwary Retirement News:

लांब केस, आक्रमक फलंदाजी आणि मूळचा झारखंडचा. सौरव तिवारीची (Saurabh Tiwary) वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळताना या फलंदाजाने धावांचा पाऊस पाडला आहे. त्याची आक्रमक फलंदाजी पाहून त्याला दुसरा एमएस धोनी (MS Dhoni) असंही म्हटलं जायचं. (Saurabh Tiwary Retired)

देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएल स्पर्धा गाजवल्यानंतर या फलंदाजाला भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. मात्र त्याला या संधीचा पुरेपूर फायदा घेता आला नाही. दरम्यान त्याने क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. या आठवड्यात तो झारखंड संघासाठी आपला शेवटचा सामना खेळताना दिसून येणार आहे.

सौरव तिवारीच्या कारकिर्दीबद्दल (Saurabh Tiwary Stats) बोलायचं झालं तर त्याला भारतीय संघासाठी ३ वनडे सामने खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याने ८७.५ च्या सरासरीने ४९ धावा केल्या. यादरम्यान ३७ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याला आपला ठसा उमटवता आला नाही. मात्र आयपीएलमध्ये दमदार खेळ करत त्याने सर्वांची मन जिंकली. (Cricket news in marathi)

सौरव तिवारीच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने ९३ सामन्यांमध्ये १२०.१ च्या स्ट्राईक रेटने आणि २८.७३ च्या सरासरीने १४९४ धावा केल्या आहेत. आयपीएल २०११ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात त्याच्यावर सर्वात मोठी बोली लागली होती. यापूर्वी २०१० मध्ये झालेल्या हंगामात त्याने मुंबई इंडियन्स संघासाठी दमदार खेळी केली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मासिक पाळीविषयीचे समज आणि गैरसमज, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं, वाचा सविस्तर!

Maharashtra News Live Updates: विधानसभेसाठी पुण्यात मनसेचे उमेदवार तयार?

Diwali Festival: दिवाळीला दारात तेलाचा की तुपाचा दिवा लावावा?

Maharashtra Politics : आणखी एक भाजप आमदार तुतारी हाती घेणार ? महत्वाची माहिती आली समोर

Maharashtra Politics: गडकरी समर्थक असल्यामुळे माझ्यावर कारवाई, नागपूरमधील भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ

SCROLL FOR NEXT