big blow for team india rohit sharma not playing in 3rd day of india vs england 5th test due to stiff back  twitter
Sports

Rohit Sharma Injury: टीम इंडियाला मोठा धक्का! कर्णधार रोहित शर्मा दुखापतग्रस्त; केव्हा होणार कमबॅक?

India vs England 5th Test: इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या शेवटच्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाला आहे.

Ankush Dhavre

Rohit Sharma Injury:

इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या शेवटच्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाला आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाचा डाव ४७७ धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर भारतीय संघातील खेळाडू क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानात उतरले. मात्र त्यात रोहित शर्माचा समावेश नव्हता.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआयने) आपल्या अधिकृत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत रोहित शर्मा दुखापतग्रस्त असल्याची माहिती दिली आहे. त्यांनी लिहीले की, ' कर्णधार रोहित शर्मा पाठीच्या दुखण्यामुळे तिसऱ्या दिवशी मैदानावर उतरणार नाही.' रोहित शर्माच्या अनुपस्थितीत उपकर्णधार जसप्रीत बुमराह संघाचं नेतृत्व करतोय.

बुमराहने यापूर्वी देखील भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. भारतीय संघाने इंग्लंडवर २५९ धावांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा डाव लवकरात लवकर गुंडाळून सामना जिंकण्याच्या प्रयत्नात असणार आहे. (Cricket news in marathi)

रोहित शर्मा केव्हा परतणार?

दुखापतीमुळे संघाबाहेर झालेला रोहित शर्मा मैदानावर केव्हा परतणार याबाबत कुठलीही माहिती समोर आलेली नाही. त्याची दुखापत पाहता तो तिसऱ्या दिवशी विश्रांती घेऊन चौथ्या दिवशी मैदानावर येऊ शकतो.

हा मालिकेतील शेवटचा सामना आहे. हा सामना झाल्यानंतर सर्व खेळाडू आयपीएल स्पर्धेसाठी सराव करताना दिसून येतील. येत्या २२ मार्चपासून आयपीएल २०२४ स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेत रोहित मुंबईकडून खेळताना दिसून येणार आहे. त्याची दुखापत गंभीर असेल तर ही मुंबई इंडियन्स संघासाठी चिंतेची बाब ठरु शकते.

रोहितने पाचव्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात १६२ चेंडूंचा सामना करत १०३ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने १३ चौकार आणि ३ षटकार मारले. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील १२ वे शतक ठरले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025 Final : भारताविरुद्ध फायनलआधी पाकिस्तानच्या महत्वाच्या खेळाडूंना ICC चा दणका

Maharashtra Live News Update: परभणी जिल्ह्यात 3 दिवसानंतर पुन्हा एकदा जोरदार पाऊस

Hypertension India: २१ कोटी भारतीयांना हाय ब्लड प्रेशरचा धोका! तिशी ओलांडलेल्या तरुणांनो व्हा सावध, WHO नेमकं काय सांगितलं?

आदिवासी समाजाचा मुंबई बंदचा इशारा; 'आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा', हजारो बांधव सहभागी|VIDEO

Asia Cup 2025: भारत आणि पाकिस्तान दोन्हीही संघ होणार मालामाल; आशिया कप विजेत्याला किती पैसे मिळणार? जाणून घ्या प्राइस मनी!

SCROLL FOR NEXT