रिकूं सिंग आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. शेवटच्या षटकांमध्ये फलंदाजीला येऊन तो संघाला आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत पोहचवतो. राजस्थान रॉयल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात तो सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला. यादरम्यान त्याने ९ चेंडूत १ चौकार आणि २ षटकारांच्या साहाय्याने २० धावांची खेळी केली. दरम्यान या सामन्यानंतर रिंकू सिंगबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
रिंकू सिंग या सामन्यात फलंदाजीला आला त्यानंतर तो क्षेत्ररक्षण करण्यासाठी आलाच नाही. त्याच्याऐवजी वैभव अरोडा क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानावर आला. तो दुखापतीमुळे क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानावर येऊ शकला नव्हता. मात्र दुखापतग्रस्त असातानाही तो फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरला होता. रिंकू सिंग पुढील सामन्यापर्यंत पूर्णपणे फिट होऊ शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
रिंकू सिंगच्या फिटनेसबाबत अपडेट देताना फिल्डिंग कोच म्हणाले की, ' रिंकू सिंगला किरकोळ दुखापत झाली आहे. तो पूर्णपणे फिट नाही. त्यामुळे आम्ही त्याला विश्रांती देणार आहोत. पूर्णपणे फिट झाल्यानंतर तो पुन्हा एकदा मैदानात क्षेत्ररक्षण करण्यासाठी उतरेल. '
तसेच आपल्या दुखापतीबाबत बोलताना रिंकू सिंग म्हणाला की, ' मला किरकोळ दुखापत झाली आहे. त्यामुळे मी क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानावर येऊ शकलो नाही. २१ एप्रिल रोजी होणाऱ्या सामन्यात मी क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानात उतरेल.'
आयपीएल २०२४ स्पर्धा झाल्यानंतर अमेरिका आणि वेस्टइंडीजमध्ये टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेसाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा केली जाणार आहे. या संघात रिंकू सिंगला देखील स्थान मिळण्याची चर्चा आहे. मात्र ऐनवेळी दुखापतग्रस्त झाल्याने त्याला संघात स्थान देण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.