big blow for team india jasprit bumrah will not play india vs australia 2nd odi team management gave him rest  saam tv
Sports

IND vs AUS, 2nd ODI: इंदुर वनडेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! जसप्रीत बुमराह बाहेर; मोठं कारण आलं समोर

Jasprit Bumrah Ruled Out: दुसऱ्या वनडेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.

Ankush Dhavre

IND vs AUS, 2nd ODI:

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना इंदुरच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्यापूर्वी एक मोठी अपडेट समोर आली आहे. संघातील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुसऱ्या वनडेतून बाहेर झाला आहे.

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा वनडे सामना सुरू होण्यापूर्वी बीसीसीआयने ट्वीट करत याबाबत माहिती दिली आहे.

बीसीसीआयने आपल्या ट्वीटमध्ये लिहिले की, ' जसप्रीत बुमराह दुसऱ्या वनडेसाठी इंदुरला जाणार नाही. आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी त्याला टीम मॅनेजमेंटकडून विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्याऐवजी मुकेश कुमारला संधी देण्यात आली आहे. राजकोटमध्ये होणाऱ्या तिसऱ्या वनडेत तो भारतीय संघासोबत जोडला जाणार आहे.

जसप्रीत बुमराहने पहिल्या वनडेत १० षटके गोलंदाजी केली. यादरम्यान त्याने ४.३० च्या इकोनॉमीने ४३ धावा खर्च करत १ गडी बाद केला. दुसरा वनडे सामना हा मालिका जिंकण्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असणार आहे. या सामन्यात जसप्रीत बुमराहची अनुपस्थिती ही भारतीय संघाची चिंता वाढवणारी बाब आहे. दुसऱ्या वनडेसाठी जसप्रीत बुमराहऐवजी प्रसिद्ध कृष्णाला भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे. (Latest sports updates)

या सामन्यासाठी असा आहे भारताचा संघ:

शुभमन गिल, रुतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार/यष्टीरक्षक), ईशान किशन, सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड विरूद्ध बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

Hair Care Tips: झोपताना केस बांधावे की मोकळे ठेवावे, काय फायदेशीर?

Sweet Corn Dosa Recipe : पावसाळ्यात संध्याकाळचा नाश्ता होईल खास, १० मिनिटांत बनवा चटपटीत 'स्वीट कॉर्न डोसा'

Accident: भीषण अपघात! अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या बसचा ब्रेक फेल, ४ वाहनांना धडक; ३६ प्रवासी गंभीर जखमी

कोणत्या देशात iPhone चा वापर सगळ्यात जास्त केला जातो? उत्तर वाचून बसेल धक्का

SCROLL FOR NEXT