team india saam tv news
Sports

IND vs ENG: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! दुसऱ्या कसोटीतून स्टार खेळाडू होऊ शकतो बाहेर

Ravindra Jadeja: भारत आणि इंंग्लंड यांच्यातील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान दुसऱ्या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

Ankush Dhavre

Ravindra Jadeja Injury:

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना हैदराबादच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात २३१ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाला २८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे.

या पराभवासह भारतीय संघ कसोटी मालिकेत १-० ने पिछाडीवर आहे. दरम्यान दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघ जोरदार कमबॅक करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. या सामन्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

या सामन्यात धावांचा पाठलाग करत असताना रविंद्र जडेजा धावबाद होऊन माघारी परतला. बेन स्टोक्सने डायरेक्ट हिट करत त्याला पॅव्हेलियनची वाट दाखवली. हा केवळ सामन्यातीलच नव्हे तर या संपूर्ण मालिकेतील टर्निंग पॉईंट ठरु शकतो. कारण धाव असताना त्याच्या स्नायूंच्या ताणामुळे त्रस्त असल्याचं दिसून आलं. त्याने या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना ८७ धावा चोपल्या होत्या. तर गोलंदाजी करत असताना दोन्ही डावात मिळून ५ गडी बाद केले. (Latest sports updates)

रविंद्र जडेजाचे स्नायूं ताणले असल्याचं दिसून आलं आहे. कारण वेगाने धावल्यानंतर तो आपल्या पायांच्या स्नायूंवर हात फिरवाताना दिसून आला. हा सामना झाल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडला रविंद्र जडेजाबाबत प्रश्न विचारला गेला होता. त्यावेळी तो म्हणाला की,'माझी फिजिओसोबत काहीच चर्चा झालेली नाही. मी जाऊन फिजिओसोबत चर्चा करेल आणि ठरवेल की नक्की काय झालं आहे.'

तसेच राहुल द्रविड पुढे म्हणाले की,'मला त्यांचं मुल्यांकन करताना जास्त कठोर व्हायचं नाही. खेळपट्टी खरच आव्हानात्मक होती. आमच्या युवा फलंदाजांना या परिस्थितीशी जुळवून घेणं थोडं कठीण होतं. मात्र युवा खेळाडूंमध्ये कौशल्य आहे'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राहुल गांधींवरील एफआयआरच्या निषेधार्थ काँग्रेसचे तीव्र आंदोलन

मोठी दुर्घटना! समुद्रात बोट उलटली; भाजप नेत्याचा दुर्दैवी मृत्यू, कोकणाच्या राजकारणावर शोककळा

Pakistan cricket team: पाकड्यांचं डोकं फिरलं...! इंग्लंडविरुद्ध हरले म्हणून ७ खेळाडूंना बाहेर काढले; तिसऱ्या कसोटीपूर्व मुख्य प्रशिक्षकालाही हाकललं

Laptop : लॅपटॉप वारंवार हँग होतोय? एकही रुपया खर्च न करता 'असा' वाढवा झटपट स्पीड

Badshah Divorce : बॉलीवूडमध्ये पुन्हा खळबळ! 'या' प्रसिद्ध रॅपरने घेतला ५ महिन्यातच घटस्फोट; ईशा रिखीसोबत नाते संपले

SCROLL FOR NEXT