team-india saam tv news
Sports

WTC Points Table: टीम इंडियाला मोठा धक्का! बांगलादेशच्या ऐतिहासिक विजयानंतर WTC च्या पॉईंट्स टेबलचं समीकरण बदललं

Bangladesh vs New Zealand: बांगलादेशने बलाढ्य न्यूझीलंडवर विजय मिळवला आहे. या विजयानंतर गुणतालिकेत मोठा फेरबदल पाहायला मिळाला आहे.

Ankush Dhavre

WTC Points Table:

न्यूझीलंडचा संघ बागंलादेश दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशने न्यूझीलंडचा धूव्वा उडवत १५० धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह बांगलादेशने कसोटी मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे. दरम्यान या विजयासह बांगलादेशने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या गुणतालिकेत आपलं खातं उघडलं आहे.

१८१ वर आटोपला न्यूझीलंडचा डाव..

बांगलादेशचा गोलंदाज ताइजुल या डावात चमकला. त्याने पहिल्या डावात १०९ धावा खर्च करत ४ गडी बाद केले. तर दुसऱ्या डावात त्याने ७५ धावा खर्च करत ६ गडी बाद केले. न्यूझीलंडला विजय मिळवण्यासाठी ३३२ धावांची गरज होती.

या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव अवघ्या १८१ धावांवर संपुष्टात आला. ताईजुलसह फिरकी गोलंदाज नईम हसनने देखील या डावात अप्रतिम गोलंदाजी केली. त्याने ४० धावा करत २ गडी बाद केले. तर शोरफुल इस्लामने १ आणि मेहदी हसनने १ गडी बाद केला.

बांगलादेशच्या विजयाने भारतीय संघाचं नुकसान..

बांगलादेशच्या विजयानं भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत बांगलादेशने १२ गुणांची कमाई केली आहे. तर विजयाची सरासरी १०० टक्के इतकी झाली आहे.

सध्या बांगलादेशचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. तर भारतीय संघ तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. भारतीय संघाने २ सामने खेळले आहेत. यापैकी एका सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला आहे.तर सामना ड्रॉ राहिला आहे. भारतीय संघ १६ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे.तर भारतीय संघाची विजयाची सरासरी ६६.६७ इतकी आहे. (Latest sports updates)

पाकिस्तानचा संघ अव्वल स्थानी..

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या गुणतालिकेत पाकिस्तानचा संघ अव्वल स्थानी आहे. पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका खेळली गेली होती. या मालिकेतील दोन्ही सामन्यांमध्ये पाकिस्तानने बाजी मारली होती. २४ गुणांसह पाकिस्तानचा संघ अव्वल स्थानी आहे.

तर चौथ्या स्थानी ऑस्ट्रेलियाचा संघ तर पाचव्या स्थानी वेस्टइंडिजचा संघ आहे. येत्या काही दिवसात भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २ कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. या मालिकेत भारतीय संघाने विजय मिळवला, तर गुणतालिकेत मोठा उलटफेर पाहायला मिळू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मला I-Phone हवाच' बायको हट्टाला पेटली, नवऱ्याला शिवीगाळ करत छतावरून ढकललं

Lalbaugcha Raja 2025: गुलाल अन् फुलांची उधळण; लालबागच्या राजाच्या निरोपाचा भावनिक क्षण

Red Chilli Benefits : लाल मिरचीचे गुप्त आरोग्यदायी गुण; जाणून घ्या निरोगी आरोग्याचं गुपित

Maharashtra Live News Update: नोएडा, उत्तर प्रदेशातील अनेक भागांत पावसाने लावली हजेरी

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

SCROLL FOR NEXT