team india twitter
Sports

Champions Trophy: चॅम्पियन्स ट्रॉफीआधी संघाला मोठा धक्का! प्रमुख गोलंदाजानंतर धाकड फलंदाज दुखापतग्रस्त

Rassie Van Der Dussen Got Injured: चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा सुरु होण्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे. संघातील प्रमुख फलंदाज दुखापतग्रस्त झाला आहे.

Ankush Dhavre

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा थरार पाकिस्तान आणि युएईत रंगणार आहे. या स्पर्धेला येत्या १९ फेब्रुवारीपासून होणार आहे. या स्पर्धेत एकूण ८ संघ खेळताना दिसून येणार आहेत. या स्पर्धेसाठी जवळपास सर्वच संघांनी आपल्या संघाची घोषणा केली आहे.

दक्षिण आफ्रिकेनेही काही दिवसांपूर्वी आपल्या संघाची घोषणा केली होती. दरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर असताना आता दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे. संघातील प्रमुख गोलंदाज स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर आता प्रमुख फलंदाज दुखापतग्रस्त झाला आहे.

हा स्टार फलंदाज झाला दुखापतग्रस्त

दक्षिण आफ्रिकेने काही दिवसांपूर्वीच चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आपल्या संघाची घोषणा केली. दरम्यान या संघात स्थान देण्यात आलेला फलंदाज रासी वॅन डर डुसेन दुखापतग्रस्त झाला आहे. दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू दक्षिण आफ्रिका टी-२० लीग खेळण्यासाठी मैदानात उतरले आहेत.

या स्पर्धेतील एका सामन्यात क्षेत्ररक्षण करताना तो दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे त्याच्या चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दक्षिण आफ्रिकेला याआधी मोठा धक्का बसला आहे. संघातील अनुभवी गोलंदाज एनरिक नॉर्खिया दुखापतीमुळे संघाबाहेर झाला आहे.

नेमकं काय घडलं?

तर झाले असे की, दक्षिण आफ्रिका टी-२० लीग स्पर्धेतील सामन्यात पार्ल रॉयल्स आणि एमआय केप टाऊन हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात वान डर डुसेन हा कवर पॉईंटच्या दिशेला क्षेत्ररक्षण करत होता. त्यावेळी ट्रेन्ट बोल्ट गोलंदाजी करत होता. त्याच्या गोलंदाजीवर फलंदाजाने जोरदार शॉट मारला.

वान डर डुसेनने हा चेंडू थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो चेंडू त्याच्या हाताच्या बोटांना लागून सीमा रेषेपार गेला. चेंडू लागताच त्याने बोटांवर आईसपॅक ठेवला. सामन्यानंतर त्याच्या बोटाला सुज आल्याचं दिसून आलं. या सामन्यात दुखापतग्रस्त होण्यापूर्वी त्याने फलंदाजीत ६४ चेंडूंचा सामना करत ९१ धावांची खेळी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, वर्षभर एसटी प्रवास मोफत

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

SCROLL FOR NEXT