sanju samson yandex
Sports

Champions Trophy: Sanju Samson वर पुन्हा अन्याय? विकेटकिपिंगसाठी ही २ नावं चर्चेत

Sanju Samson, ICC Champions Trophy: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी येत्या १९ जानेवारीला भारतीय संघाची घोषणा केली जाऊ शकते. दरम्यान या संघातून संजू सॅमसनला वगळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Ankush Dhavre

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या स्पर्धेला येत्या १९ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील सामने पाकिस्तान आणि यूएईत रंगणार आहेत.

पाकिस्तान आणि भारताला वगळलं तर उर्वरीत सर्वच संघांनी आपल्या संघाची घोषणा केली आहे. माध्यमातील वृत्तानुसार, येत्या १९ जानेवारीला भारतीय संघाची घोषणा केली जाऊ शकते. त्यामुळे कोणाला संधी मिळणार आणि कोणाचा पत्ता कट होणार? अशी चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे.

भारतीय टी-२० संघातील स्टार फलंदाज संजू सॅमसनने गेल्या काही टी -२० मालिकांमध्ये आपल्या फलंदाजीचा ठसा उमटवला आहे. टी-२० क्रिकेटमध्ये हिट ठरत असला तरीदेखील वनडे क्रिकेटमध्ये त्याला आपलं स्थान निश्चित करता आलेलं नाही.

त्याचा सध्याचा फॉर्म पाहता त्याला वनडे संघात स्थान देण्याची मागणी जोर धरत आहे. मात्र आता संजूच्या फॅन्सचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे.

संजूला पुन्हा एकदा डच्चू मिळणार?

पीटीआयच्या वृत्तानुसार, दमदार फॉर्ममध्ये असणाऱ्या संजू सॅमसनला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत केएल राहुलची यष्टीरक्षक फलंदाज म्हणून निवड केली गेली होती. मात्र आता त्याला फलंदाज म्हणून संघात स्थान दिले जाऊ शकते. तर रिषभ पंतला यष्टीरक्षक फलंदाज म्हणून स्थान दिलं जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर बॅकअप यष्टीरक्षक म्हणून ध्रुव जुरेलला संधी दिली जाऊ शकते.

संजू सॅमसनच्या वनडे कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने २०२१ मध्ये पदार्पण केलं होतं. त्याला या फॉरमॅटमध्ये १६ सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यादरम्यान त्याला ५६.७ च्या सरासरीने ५१० धावा करता आल्या आहेत. ज्यात १ शतक आणि ३ अर्धशतकांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT