India vs Newzealand, 1st Test: न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात होणार आहे. हा सामना बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगणार आहे.
मात्र पावसामुळे हा सामना अजूनही सुरु होऊ शकलेला नाही. दरम्यान सामना सुरु होण्यापूर्वीच न्यूझीलंडला मोठा धक्का बसला आहे. संघातील प्रमुख खेळाडू केन विलियम्सन या सामन्यात खेळणार नसल्याची माहिती समोर येत आहे. अनुभवी खेळाडू केन विलियम्सन पहिल्या कसोटी सामन्याला मुकणार आहे.
केन विलियम्सन हा न्यूझीलंड संघातील सर्वात अनुभवी खेळाडू आहे. त्याला भारतीय संघाविरुद्ध खेळण्याचा भरपूर अनुभव आहे. काही दिवसांपूर्वी श्रीलंकेविरुद्ध झालेल्या सामन्यादरम्यान तो दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे त्याला संघाबाहेर व्हावं लागलं होतं. तेव्हापासून तो आपली फिटनेस पुन्हा मिळवण्याच्या प्रयत्नात आहे.
मात्र तरीदेखील त्याचा भारतीय संघाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंड संघात समावेश करण्यात आला आहे. त्याचा दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी संघा समावेश करण्यात आला आहे. मात्र त्याच्या कमबॅकबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्याच्या जागी विल यंगला संधी मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे.
भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला सामना १६ ऑक्टोबरला रसुरु होईल. हा सामना बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगणार आहे. तर मालिकेतील दुसरा सामना २४ ऑक्टोबरपासून तर मालिकेतील तिसरा सामना १ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे.
असा राहिलाय केन विलियन्सनचा रेकॉर्ड
केन विलियम्सन हा न्यूझीलंड संघातील सर्वात अनुभवी फलंदाज आहे. त्याच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत न्यूझीलंड संघासाठी १०२ कसोटी सामन्यांमध्ये ८८८१ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ३२ शतक आणि ३५ अर्धशतक झळकावली आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.