IPL 2023, CSK, MS Dhoni News : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल २०२३ च्या पर्वाची सुरुवात लवकरच होणार आहे. ही महत्वाची स्पर्धा सुरू होण्याआधीच महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज संघाला मोठा दणका मिळाला आहे.
चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघाचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स याच्या गुडघ्याला दुखापत झाल्याने तो मोसमाच्या सुरुवातीच्या सामन्यांत गोलंदाजी करू शकणार नाही. तो अनफिट आहे. न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड यांच्यात झालेल्या कसोटी मालिकेत स्टोक्स दुखापतीनं त्रस्त होता. (Sports News)
ईएसपीएन क्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार, गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्रस्त असलेला बेन स्टोक्स सावरला असला तरी, सुरुवातीच्या सामन्यांत तो केवळ फलंदाज म्हणून खेळणार आहे. दुखापतीमुळे त्रस्त असलेला स्टोक्स न्यूझीलंड दौऱ्यातील कसोटी मालिकेत दोन कसोटीत केवळ नऊ षटके टाकू शकला. (Cricket News Update)
इंग्लंडला जून महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध अॅशेस मालिका खेळायची आहे. चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) फलंदाजी प्रशिक्षक मायकल हसीने सांगितले की, स्टोक्स आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांत गोलंदाजी करणार नाही.
हसी म्हणाला की, ''मला असे वाटते की तो फलंदाज म्हणूनच चेन्नईकडून खेळणार आहे. गोलंदाजीसाठी त्याला अजून वाट बघावी लागणार आहे. सुरुवातीच्या काही सामन्यांत स्टोक्स गोलंदाजी करू शकणार नाही. मात्र, त्यानंतर तो गोलंदाजी करेल असे अपेक्षित आहे.''
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.