Kolkata knight riders twitter
Sports

IPL 2025: IPLआधी KKR ला मोठा धक्का! 6 कोटीत घेतलेला प्रमुख गोलंदाज दुखापतग्रस्त

Anrich Nortje Injury: आयपीएल २०२५ स्पर्धा सुरु होण्याआधी कोलकाता नाईट रायडर्सला मोठा धक्का बसला आहे. संघातील प्रमुख गोलंदाज दुखापतग्रस्त झाला आहे.

Ankush Dhavre

आयपीएल २०२५ स्पर्धा सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. ही स्पर्धा सुरु होण्यापू्र्वी पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये टी-२० मालिकेचा थरार सुरु आहे. या मालिकेदरम्यान दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.

संघातील प्रमुख वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्खिया मालिकेतून बाहेर पडला आहे. हा दक्षिण आफ्रिकेसाठी मोठा धक्का आहेच, यासह कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या टेन्शनमध्येही वाढ झाली आहे.

एनरिक नॉर्खिया दुखापतग्रस्त

एनरिक नॉर्खिया दुखापतीमुळे पहिला कसोटी सामनाही खेळू शकला नव्हता. सराव करत असताना त्याच्या उजव्या पायाच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. बुधवारी स्कॅन केलं असता, फ्रॅक्चर असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे त्याला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. एनरिक नॉर्खियाची रिप्लेसमेंट म्हणून दयान गेलीमला संघात स्थान दिलं गेलं आहे.

कोलकाता नाईट रायडर्सचं टेन्शन वाढणार?

सौदी अरेबियातील जेद्दाहमध्ये आयपीएल २०२५ स्पर्धेसाठीचा लिलाव पार पडला होता. या लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने एनरिक नॉर्खियाला ६ कोटींची बोली लावून आपल्या संघात स्थान दिले होते.

त्याच्याकडे या संघातील प्रमुख गोलंदाज म्हणून पाहिलं जात होतं. मात्र आता तो दुखापतग्रस्त झाला आहे. नॉर्खिया गेल्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना दिसून आला होता. दरम्यान आयपीएल सुरु व्हायला अजूनही ३ महिने शिल्लक आहेत. त्यामुळे तो पूर्णपणे फिट होऊन मैदानात परतणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

कोलकाता नाइट रायडर्स

फलंदाज

रिंकू सिंग

क्विंटन डी कॉक (द. आफ्रिका)

अंगक्रिश रघुवंशी

रहमानुल्लाह गुरबाज ( अफगाणिस्तान)

मनीष पांडे

लवनीत सिसोदिया

अजिंक्य रहाणे

ऑल राउंडर

सुनील नरेन (वेस्ट इंडिज)

आंद्रे रसेल (वेस्ट इंडिज)

रमनदीप सिंग

वेंकटेश अय्यर

रोव्हमन पॉवेल (वेस्ट इंडिज)

मोईन अली (इंग्लंड)

गोलंदाज

वरून चक्रवर्ती

हर्षित राणा

ऑनरिक नॉर्खिया (द. आफ्रिका)

वैभव अरोरा

मयंक मार्कंडे

स्पेन्सर जॉन्सन ( ऑस्ट्रेलिया)

अनुकूल रॉय

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party: खराडीतील रेव्ह पार्टीपूर्वी आरोपींची आणखी २ ठिकाणी पार्टी, तपासातून धक्कादायक माहिती उघड

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सोलापुरात पार पडलं महाआरोग्य शिबीर

पावसात लहानग्यांचे आरोग्य जपण्यासाठी घ्या 'ही' खबरदारी

Shirur News : शेतकरी दाम्पत्याची दोन एकर शेती सातबारावरून गायब; तलाठी व मंडळ अधिकाऱ्याचा प्रताप

Pune : ट्युशनमध्ये मुलाला बेल्ट अन् वह्यांनी बेदम मारहाण, ३५ वर्षाच्या शिक्षिकेवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT