big blow for delhi capitals star batter harry brook ruled out of ipl 2024 cricket news in marathi  twitter
Sports

IPL 2024,Harry Brook: दिल्ली कॅपिटल्सचे ४ कोटी पाण्यात! IPL तोंडावर असताना स्टार खेळाडूची माघार

IPL 2024, Harry Brook News In Marathi: या स्पर्धेपूर्वीच दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का बसला आहे. स्पर्धा तोंडावर असताना स्टार खेळाडूने माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

Ankush Dhavre

Harry Brook Ruled Out From IPL 2024:

आयपीएल २०२४ स्पर्धा सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत.या स्पर्धेसाठी सर्व संघांनी कसून सराव करायला देखील सुरुवात केली आहे. दरम्यान या स्पर्धेपूर्वीच दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का बसला आहे. स्पर्धा तोंडावर असताना स्टार खेळाडूने माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. (Harry Brook)

दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाचा विस्फोटक फलंदाज हॅरी ब्रुकने आयपीएल २०२४ स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. आता दिल्ली कॅपिटल्सने त्याच्याऐवजी बदली खेळाडूचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. आयपीएल २०२४ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात दिल्ली कॅपिटल्सने हॅरी ब्रुकला ४ कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिलं होतं. (Harry Brook Replacement)

हॅरी ब्रुकचा भारत- इंग्लंड कसोटी मालिकेसाठी इंग्लंडच्या संघात समावेश करण्यात आला होता. मात्र त्याने वैयक्तिक कारणास्तव माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, हॅरी ब्रुकने आयपीएल २०२४ स्पर्धेतून नाव मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रुकला आयपीएल स्पर्धेत जास्त सामने खेळण्याचा अनुभव नाही. त्याने या स्पर्धेत ११ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने १९० धावा केल्या आहेत. गेल्या हंगामात त्याने सनरायझर्स हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्व केले होते. या संघाकडून खेळताना त्याने १ शतक देखील झळकावलं होतं. (Cricket news in marathi)

आयपीएल २०२४ स्पर्धेपूर्वी सनरायझर्स हैदराबादने त्याला रिलीझ करण्याचा निर्णय घेतला होता. आयपीएल २०२४ स्पर्धेपूर्वी पार पडलेल्या लिलावात त्याची मुळ किंमत २ कोटी रुपये होती. या लिलावात दिल्ली कॅपिटल्सने त्याला डबलची बोली लावत आपल्या संघात स्थान दिलं. आता त्याच्या जागी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज जेक फ्रेझर-मॅकगर्कला संधी दिली जाऊ शकते.

हॅरी ब्रुकच्या टी-२० क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने १२७ सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ३०३२ धावा केल्या आहेत. त्याच्या नावे ३ शतक आणि ११ अर्धशतक झळकावण्याची नोंद आहे. दरम्यान १०५ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

Anant Chaturdashi 2025 live updates : वर्धा जिल्ह्यात भक्तिभावात बाप्पांना निरोप

Maharashtra Live News Update: न्यायालयीन आणि रस्त्यावरील आंदोलनाची तयारी, ओबीसी नेत्याची बैठक संपली

हिंगोलीत अनंत चतुर्दशीचा जल्लोष; चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी लाखो महिला भाविकांची उपस्थिती|VIDEO

SCROLL FOR NEXT