IPL 2024: RCB चे सामने बंगळुरुत होणार नाहीत? फॅन्सची चिंता वाढली, कारण आलं समोर

Bengaluru Water Crisis: आयपीएल २०२४ स्पर्धा सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वी क्रिकेट फॅन्सची चिंता वाढवणारं कारण समोर आलं आहे.
ipl 2024 bengaluru facing water crisis may impact on royal challengers bangalore matches in m chinnasway
ipl 2024 bengaluru facing water crisis may impact on royal challengers bangalore matches in m chinnasway saam tv news
Published On

Bengaluru Water Crisis News:

आयपीएल २०२४ स्पर्धा सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वी क्रिकेट फॅन्सची चिंता वाढवणारं कारण समोर आलं आहे. बीसीसीआयकडून आयपीएलच्या सुरुवातीच्या २१ सामन्यांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. यादरम्यान काही सामने बंगळुरुतील एम चिन्नास्वामीच्या मैदानावर रंगणार आहेत. दरम्यान या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी बंगळुरुत पाणी टंचाईची समस्या उद्भवली आहे. त्यामुळे या मैदानावर होणारे सामने दुसऱ्या मैदानांवर खेळवण्याची मागणी जोर धरु लागली आहे.

आयपीएल २०२४ स्पर्धेतील पहिल्या टप्प्यातील ३ सामने या मैदानावर रंगणार आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला सामना २५ मार्च रोजी पंजाब किंग्जविरुद्ध रंगणार आहे. तर दुसरा सामना २९ मार्च रोजी कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध रंगणार आहे. तिसरा सामना २ एप्रिल रोजी लखनऊ सुपर जायंट्स संघाविरुद्ध रंगणार आहे. या सामन्यांपूर्वी कर्नाटक राज्य क्रिकेट संघाने स्पष्ट केलं आहे की, पाणी टंचाईचा सुरुवातीच्या ३ सामन्यांवर कुठलाही परिणाम होणार नाही. कारण स्टेडियमच्या आऊटफिल्डसाठी आणि खेळपट्टीसाठी सीवेज प्लांटचे पाणी वापरले जाणार आहे. (Cricket news in marathi)

ipl 2024 bengaluru facing water crisis may impact on royal challengers bangalore matches in m chinnasway
IND vs ENG Test Series: भारतात इंग्लंडचा दारुण पराभव का झाला? माजी खेळाडूने सांगितलं कारण

कर्नाटक राज्य क्रिकेट संघाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभेंदू घोष यांनी म्हटले की, 'सध्या पाणी टंचाईचा कुठलाही परिणाम होणार नाहीये. पाण्याचा वापर करण्यासाठी आम्हाला राज्य सरकारकडून अनुमती दिली गेली आहे. मार्गदर्शक तत्वांचं पालन करता यावं म्हणून आम्ही सातत्याने बैठका घेतोय.

बंगळुरु पाणी पुरवठा विभागाकडून नोटीस जारी करण्यात आली होती ज्यात म्हटले गेले होते की, कार धुणे आणि बागकामं यासांरख्या कामांसाठी पाण्याचा वापर करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

ipl 2024 bengaluru facing water crisis may impact on royal challengers bangalore matches in m chinnasway
WPL Playoffs: मुंबईच्या पराभवानं RCB ची चांदी! पेरीच्या विक्रमी खेळीनं मिळवून दिलं प्लेऑफचं तिकीट

शुभेंदु घोष म्हणाले की,' आम्ही आऊटफिल्ड, खेळपट्टी आणि इतर कामांसाठी सीवेज प्लांटच्या पाण्याचा वापर करतोय. एका सामन्यासाठी आम्हाला कमीत कमी १० ते १५ हजार लीटर पाण्याची आवश्यकता भासेल. मात्र आम्हाला विश्वास आहे की, सीवेज प्लांटने आम्हाला आवश्यक असलेलं पाणी मिळेल. यासाठी आम्हाला जमिनीतून येणाऱ्या पाण्याची गरज भासणार नाही.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com