IND vs AUS 2nd Test, Josh Hazlewood: बॉर्डर गावसकर मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने शानदार कामगिरी करत २९५ धावांनी विजय मिळवला होता. या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ ०-१ ने पिछाडीवर आहे. मालिकेतील दुसऱ्या सामन्याला येत्या ५ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे.
या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. संघातील प्रमुख गोलंदाज जोश हेजलवूड दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला आहे.
मालिकेतील पहिल्या कसोटीत त्याने शानदार कामगिरी केली होती. आता ॲडीलेडमध्ये होणाऱ्या डे नाईट कसोटीत तो खेळताना दिसून येणार नाही. हा ऑस्ट्रेलियासाठी सर्वात मोठा धक्का असणार आहे.
मालिकेतील पहिला कसोटी सामना पर्थमध्ये पार पडला. या सामन्यात गोलंदाजी करताना त्याने ३४ षटक गोलंदाजी केली आणि ५७ धावा खर्च केल्या. त्याच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारताचा डाव १५० धावांवर संपुष्टात आणला. त्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय संघाने ४८७ धावांचा डोंगर उभारला. आता साईड स्ट्रेनमुळे त्याला दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडावं लागलं आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जोश हेजलवूडच्या दुखापतुबाबत माहिती देत म्हटले की, ' जोश हेजलवूड दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीत खेळताना दिसून येणार नाही. मात्र तो पुढील सामन्याची तयारी करण्यासाठी संघासोबतच राहील.'
जोश हेजलवूड दुसऱ्या कसोटीतून बाहेर होताच, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्याच्या रिप्लेसमेंटची घोषणा केली आहे. हेजलवूडच्या जागी सीन अबॉट आणि ब्रेंडन डॉगेट यांना स्थान देण्यात आलं आहे.
पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलंड, ॲलेक्स कॅरी (यष्टिरक्षक), ट्रैविस हेड, जोश इंग्लिश (यष्टिरक्षक), उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नाथन लायन, मिचेल मार्श, नाथन मॅकस्वीनी, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, ब्यू वेबस्टर, सीन अबॉट, ब्रेंडन डॉगेट
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.