Mitchell Marsh Prediction For World Cup 2023 saam tv
Sports

Champions Trophy: ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी तोंडावर असताना प्रमुख खेळाडू स्पर्धेतून बाहेर

Mitchell Marsh Ruled Out Of Champions Trophy: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. दरम्यान ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे.

Ankush Dhavre

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. येत्या १९ फेब्रुवारीपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. मात्र भारतीय संघाचे सामने हायब्रिड मॉडेलनुसार, दुबईत खेळवले जाणार आहेत.

या स्पर्धेसाठी जवळपास सर्वच संघांनी आपल्या स्क्वाडची घोषणा केली आहे. दरम्यान या स्पर्धेपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. संघातील प्रमुख अष्टपैलू खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

स्टार अष्टपैलू खेळाडू स्पर्धेला मुकणार

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा सुरु व्हायला २० दिवासांहूनही कमी वेळ शिल्लक राहिला आहे. असं असताना ऑस्ट्रेलियाच्या अडचणीच वाढ झाली आहे. वर्ल्ड चॅम्पियन संघातील अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्श या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसह तो आयपीएल स्पर्धेतूनही बाहेर पडणार असल्याचं म्हटलं जात आहे.

त्यामुळे हा ऑस्ट्रेलियासह लखनऊ सुपर जायंट्स संघासाठीही तगडा धक्का आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दल बोलायचं झालं, तर ऑस्ट्रेलियाचा संघ आपला पहिला सामना २२ फेब्रुवारीला खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला सामना इंग्लंडविरुद्ध होणार आहे.

कसोटी संघातूनही बाहेर

ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये बॉर्डर गावसकर ट्रॉफी मालिका पार पडली. या मालिकेतही मिचेल मार्शचा फ्लॉप शो पाहायला मिळाला होता. त्यामुळे त्याला प्लेइंग ११ मधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. या मालिकेतील ७ डावात त्याला अवघ्या ७३ धावा करता आल्या होत्या.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दुखापतीबाबत काय अपडेट दिली?

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आपल्या प्रेस रिलीझमध्ये म्हटले की, मार्शला पाठीच्या दुखण्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीतून बाहेर पडावं लागणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या पाठीच्या दुखण्यात वाढ झाली आहे. त्यामुळे त्याला रिहॅबसाठी जावं लागणार आहे. लवकरच बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल.' त्यामुळे ऑस्ट्रेलियाला आता मार्शशिवाय मैदानात उतरावं लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Astro Tips: पुस्तकात मोरपंख नव्हे, 'ही' गोष्ट ठेवा आणि जीवनात जाणवा सकारात्मक बदल

Raj Thackeray: महाराष्ट्र आणि मराठीसाठी आम्ही एकत्र, राज ठाकरेंनी दिले युतीचे संकेत

Marathi Schools In Worli : दादर वरळीमधील मराठी Top 9 शाळांची नावे

Face Care: आठवड्यातून किती वेळा फेस स्क्रब केलं पाहिजे?

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

SCROLL FOR NEXT