Big blow for australia adam zampa injured while swimming ahead of india vs australia world cup match  saam tv
Sports

IND vs AUS, World Cup 2023: महामुकाबल्यापूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! संघातील स्टार गोलंदाज दुखापतग्रस्त

Adam Zampa: भारतीय संघाविरूद्ध होणाऱ्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज दुखापतग्रस्त झाला आहे.

Ankush Dhavre

IND vs AUS, World Cup 2023:

ऑस्ट्रेलियाचा संघ भारतीय संघाविरूद्ध होणाऱ्या सामन्याने वर्ल्डकप २०२३ स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या सामन्यापूर्वी ऑस्ट्रिलिया संघासाठी डोकेदुखी वाढवणारी बातमी समोर आली आहे.

संघातील प्रमुख फिरकी गोलंदाज अॅडम झांम्पा दुखापतग्रस्त झाला आहे. माध्यमातील वृ्त्तानूसार, स्विमिंग करत असताना तो दुखापतग्रस्त झाला आहे.

अॅडम झाम्पा जर दुखापतीमुळे या सामन्यातून बाहेर झाला तर, ऑस्ट्रेलियाच्या चिंतेत भर पडणार आहे. कारण हा सामना चेन्नईच्या खेळपट्टीवर होणार आहे. काळ्या मातीची ही खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरते.

अॅडम झाम्पाचे टप्पा पडून फिरणारे चेंडू भारतीय फलंदाजांना अडचणीत आणु शकतात. तो ऑस्ट्रेलियासाठी गेमचेंजर ठरू शकतो. कर्णधार पॅट कमिन्सने त्याच्या खेळण्याबाबत अपडेट दिली आहे. त्याची दुखापत गंभीर नसून भारतीय संघाविरूद्ध होणाऱ्या सामन्यात तो खेळताना दिसून येईल, असं पॅट कमिन्सने म्हटलं आहे.

नेमकं काय घडलं?

अॅडम झाम्पाबाबत बोलताना पॅट कमिन्स म्हणाला की,'अॅडम झाम्पा स्विमिंग पूलच्या भिंतीला जाऊन धडकला. स्विमिंग करत असताना त्याचे डोळे बंद होते. त्याला असं वाटत होतं की,तो सरळ पोहतोय. मात्र तो चुकीच्या दिशेने पोहत असल्याने सरळ जाऊन भिंतीला धडकला. ही दुखापत गंभीर नसून तो सामना खेळण्यासाठी तयार आहे.' (Latest sports updates)

चेपॉकची खेळपट्टी ही फिरकी गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरते. त्यामुळे भारतीय संघात आर अश्विन,रविंद्र जडेजा आणि कुलदीप यादव या ३ फिरकी गोलंदाजांना स्थान दिलं जाऊ शकतं.

तर ऑस्ट्रेलियाकडून अॅडम झाम्पा, ग्लेन मॅक्सवेल आणि तनवीर संघा हे ३ फिरकी गोलंदाज मैदानात उतरू शकतात.

या सामन्यासाठी अशी असू शकते ऑस्ट्रेलियाची प्लेइंग ११:

डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, कॅमरून ग्रीन, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), पॅट कमिंस (कर्णधार), मिचेल स्टार्क, सिन अबॉट, अॅडम झाम्पा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weekly Horoscope: 'या' राशींनी महत्त्वाचे निर्णय घाईत घेणं टाळावं; साप्ताहिक राशीभविष्य

Maharashtra Live News Update : ऐन दिवाळीत पावसाची शक्यता

VIDEO : हाँगकाँगमध्ये मोठी दुर्घटना! लँडिंगवेळी कंट्रोल सुटलं, कार्गो विमान थेट समुद्रात कोसळलं, दोघांचा मृत्यू

दिवाळी गोड! मोदी सरकारकडून महाराष्ट्राला 1 हजार 566 कोटींचा निधी|VIDEO

PMC Bonus: पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार! सातव्या वेतन आयोगाच्या फरकासह बोनस जाहीर

SCROLL FOR NEXT