वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत आज भारतीय संघ आपला पहिला सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. सलामीच्या सामन्यात भारतासमोर ऑस्ट्रेलियाचं आव्हान असणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाला तगडा धक्का बसला आहे.
माध्यमातील वृत्तानुसार शुबमन गिल आजारी असल्याने या सामन्यात खेळण्यासाठी उतरणार आहे. त्याची डेंग्यूची चाचणी पॉझिटीव्ह आली आहे.
कुठे अन् किती वाजता सुरू होईल सामना?
भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये होणारा हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर रंगणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी २ वाजता सुरू होईल.
हा खेळाडू करणार डावाची सुरुवात...
या सामन्यात शुबमन गिल खेळणार की नाही हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही. त्यामुळे त्याच्या जागी ईशान किशन डावाची सुरुवात करताना दिसून येऊ शकतो. रोहित आणि ईशानची जोडी संघासाठी सुरुवात करताना दिसून येईल. तर विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी येईल.
मध्यक्रमात या खेळाडूंना मिळू शकते संधी..
आशिया चषक २०२३ स्पर्धेतून कमबॅक करणारा श्रेयस अय्यर या सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसू शकतो. तर यष्टिरक्षक फलंदाज केएल राहुल पाचव्या क्रमांकावर आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी येऊ शकतो. (Latest sports updates)
या गोलंदाजांना मिळू शकते संधी..
ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणारा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर रंगणार आहे. या स्टेडियमवर फिरकी गोलंदाजांना मदत मिळते. त्यामुळे भारतीय संघ ३ फिरकी गोलंदाजांसह मैदानावर उतरू शकतो. या सामन्यासाठी रविंद्र जडेजा,कुलदीप यादव आणि आर अश्विनला संघात स्थान दिले जाऊ शकते. तर जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज या वेगवान गोलंदाजांना संघात स्थान दिले जाऊ शकते.
या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची प्लेइंग ११:
रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, आर अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.