वर्ल्डकप २०२३चा पहिल्या डबल हेडरचा दुसरा सामना दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेत खेळला जात आहे. हा सामना अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळला जात आहे. श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेला फलंदाजीला आमंत्रित केलं. परंतु लंकेचा हा निर्णय त्यांच्याच्यासाठी तोट्याचा ठरला. द.आफ्रिकेच्या फलंदाजांनी लंकेच्या गोलंदाजांची दमदार धुलाई केली. आफ्रिकेच्या तीन फलंदाजांनी शतक ठोकत लंकेसमोर ४२८ धावा करत ४२९ धावांचं आव्हान ठेवलं आहे. (Latest News)
सलामीसाठी आलेल्या हेनरिक क्लासन हा फक्त ३२ धावा करून बाद झाला. लंकेचा गोलंदाज कसून रजिथाने बाद केलं. दसुन शनाकाने त्याचा झेल घेतला. तर रासी वान डर डसन याने शतक करत १०८ धावांवर आपली विकेट दिली. दुनिथ वेल्लालागेच्या गोलंदाजीवर त्याची विकेट गेली. सदीरा समरविक्रमा त्याचा झेल घेतला. क्विंटन डी कॉकनेही शतक ठोकलं. परंतु आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमाला अवघ्या १० धावा करता आल्या नाहीत.
क्विंटन डी कॉकने वनडे करिअरच्या १८ वं शतक केलं.त्याने ८४ चेंडूत १०० धावांची खेळी केली. डी कॉकच्या खेळीत १२ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्करामने वनडे वर्ल्ड कपमध्ये सर्वात वेगवान शतक झळकावून इतिहास रचला. त्याने अवघ्या ४९ चेंडूत आपले शतक पूर्ण केलं.
दरम्यान दक्षिण आफ्रिकेनं केलेल्या धावा या वनडे वर्ल्डकपच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या आहे. श्रीलंकेला कमी धावसंख्येवर रोखण्यात दक्षिण आफ्रिकेला यश आलं तर गुणतालिकेत मोठा बदल घडणार आहे. कारण दक्षिण आफ्रिकेला दोन गुणांसह रनरेटमध्ये फायदा होणार आहे. यामुळे उपांत्य फेरीचा रस्ता मोकळा होण्यास मदत होईल. वर्ल्डकप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेला ५ वेळा पराभूत केलं आहे. तर आफ्रिकेला लंकेकडून फक्त एकदा पराभव स्वीकरावा लागलाय.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.