Chris lynn six twitter
Sports

BBL 2023: आरारा खतरनाक..ख्रिस लीनचा १०३ मीटर लांब षटकार; चेंडू स्टेडियमच्या बाहेर,Video

Chris Lynn: सध्या ऑस्ट्रेलियात बिग बॅश लीग स्पर्धेचा थरार सुरु आहे. या सामन्यात मेलबर्न रेनेगड्स आणि अॅडिलेड स्ट्रायकर्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते.

Ankush Dhavre

Big Bash League 2023 Chris Lynn Six Video:

सध्या ऑस्ट्रेलियात बिग बॅश लीग स्पर्धेचा थरार सुरु आहे. या सामन्यात मेलबर्न रेनेगड्स आणि अॅडिलेड स्ट्रायकर्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात फलंदाजी करत असताना अॅडिलेड स्ट्रायकर्स संघाचा फलंदाज ख्रिस लीनने रॉकेट शॉट मारला आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज ख्रिस लीन बिग बॅश लीग स्पर्धेत अॅडिलेड स्ट्रायकर्स संघाचं प्रतिनिधित्व करतोय. या संघाकडून फलंदाजी करताना त्याना असा काही षटकार मारला की, चेंडू बॅटला लागताच थेट स्टेडियमच्या छताला लागुन खाली पडला. त्याने ३४ चेंडूंचा सामना करत ५६ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ४ चौकार आणि ४ षटकार मारले.

तर झाले असे की,अॅडिलेड स्ट्रायकर्स संघाची फलंदाजी सुरु असताना मेलबर्नकडून गोलंदाजी करण्यासाठी कर्णधार विल सदरलँड गोलंदाजीला आला होता. या षटकातील पहिल्याच चेंडूवर ख्रिस लीनने हल्ला चढवला.

त्याने पहिल्याच चेंडूवर गगनचुंबी षटकार मारला. त्याने मारलेला हा षटकार १०३ मीटरचा होता. हा शॉट इतका रॉकेट शॉट होता की, चेंडू स्टेडियमच्या छताला लागला आणि खाली पडला. त्यानंतर फिल्ड अंपायरने चर्चा केली आणि ६ धावा घोषित केल्या. (Latest sports updates)

डॉकलँडचं स्टेडियम हे इन्डोर स्टेडियम आहे. जेव्हा कुठलाही फलंदाज मोठा फटका खेळतो, त्यावेळी चेंडू स्टेडियमच्या छताला जाऊन लागतो. यापूर्वी असे झाल्यास हा चेंडू डेड घोषित केला जायचा. मात्र आता ६ धावा दिल्या जातात.

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, प्रथम फलंदाजी करताना अॅडिलेड स्ट्रायकर्सने २० षटकअखेर ६ गडी बाद १७७ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना मेलबर्न रेनेगड्सने हे आव्हान ८ चेंडू शिल्लक ठेऊन पूर्ण केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Banana Cake: घरीच झटपट बनवा सॉफ्ट अन् टेस्टी बनाना केक, वाचा सोपी रेसिपी

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

SCROLL FOR NEXT