rinku singh twitter
Sports

Rinku Singh: BCCI ची मोठी घोषणा! इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यासाठी रिंकू सिंगला संघात स्थान

Rinku Singh In Team India: भारतीय अ संघ आणि इंग्लंड लायन्स या दोन्ही संघांमध्ये होणाऱ्या कसोटी सामन्यासाठी रिंकू सिंगचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.

Ankush Dhavre

India A squad Against England Lions:

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना येत्या २५ जानेवारीपासून हैदराबादच्या मैदानावर रंगणार आहे.

या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी भारतीय अ संघ आणि इंग्लंड लायन्स या दोन्ही संघांमध्ये ३ अनधिकृत कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ झाला आहे. या मालिकेतील पहिला सामना १७ ते २० जानेवारीदरम्यान पार पडला.

भारतीय अ संघ आणि इंग्लंड लायन्स या दोन्ही संघांमध्ये सुरु होणाऱ्या मालिकेपूर्वी बीसीसीआयने पहिल्या अनधिकृत सामन्यासाठी आणि दोन दिवसीय सराव सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली होती.

त्यानंतर बीसीसीआयने उर्वरित २ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय अ संघाची घोषणा केली. त्यावेळी रिंकू सिंगला केवळ तिसऱ्या सामन्यासाठी संघात स्थान दिलं गेलं होतं. मात्र नुकताच बीसीसीआयने मोठी घोषणा केली आहे. रिंकू सिंगला आता दुसऱ्या कसोटीसाठीही संघात स्थान दिलं गेलं आहे. (Latest cricket news in marathi)

रिंकू सिंगला जेव्हा जेव्हा संधी मिळाली आहे तेव्हा त्याने संधीचं सोनं करुन दाखवलं आहे. त्याला टी-२० क्रिकेटमध्ये सातत्याने संधी दिली जात आहे. या संधीचा फायदा घेत त्याने संघासाठी दमदार खेळ करुन दाखवला आहे. आधी त्याला टी-२० संघात स्थान दिलं गेलं होतं. टी-२० मध्ये धावांचा पाऊस पाडल्यानंतर त्याला वनडे क्रिकेटमध्ये संधी दिली गेली. इथेही त्याने संघासाठी चांगली कामगिरी केली. त्याच्या टी-२० क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर त्याने ८९ च्या सरासरीने ३५६ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने २ अर्धशतकही झळकावले आहेत.

रिंकू सिंगने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही दमदार खेळ करुन दाखवला आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील ४४ सामन्यांमध्ये ५७ च्या सरासरीने ३१०९ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ७ शतकं आणि २० अर्धशतकं झळकावली आहेत.

इंग्लंड लायन्सविरुद्ध होणाऱ्या दुसऱ्या सामन्यासाठी असा आहे भारतीय अ संघ:

अभिमन्यू इसवरन (कर्णधार), साई सुदर्शन, रजत पाटीदार, सरफराज खान, तिलक वर्मा, कुमार कुशाग्र, वॉशिंग्टन सुंदर, तुषार देशपांडे, व्ही कविरप्पा, उपेंद्र यादव, आकाश दीप, यश दयाल, रिंकू सिंग,सौरभ कुमार, अर्शदीप सिंग.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोपा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT