big announcement for icc t20 world cup 2024 there is no reserve day for 2nd semi final cricket news marathi amd2000 saam tv
क्रीडा

T20 World Cup: क्रिकेट फॅन्सचं टेन्शन वाढवणारी बातमी! T-20 WC आधी ICC ने हा नियम बदलला

Reserve Day In T20 World Cup 2024: टी-२० वर्ल्डकप स्पर्धा सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वी आयसीसीने नियमात बदल केला आहे.

Ankush Dhavre

आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेचा काऊंटडाऊन सुरू झाला आहे. या स्पर्धेला येत्या १ जूनपासून प्रारंभ होणार आहे. तर स्पर्धेतील फायनलचा सामना २९ जून रोजी रंगणार आहे. ही स्पर्धा वेस्टइंडीज आणि अमेरिकेत खेळवली जाणार आहे. या स्पर्धेतील ओपनिंगचा सामना अमेरिकेततील डलासमध्ये होणार असून स्पर्धेतील सेमीफायनल आणि फायनलचे सामना वेस्टइंडीजमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.

स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच आयसीसीने वाढवलं टेन्शन

स्पर्धा सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक असताना आयसीसीने सर्वच संघाचं टेन्शन वाढवलं आहे. आयसीसी टी -२० वर्ल्डकप स्पर्धा ही २ वर्षातून एकदा येते. त्यामुळे सामन्याचा पूर्ण निकाल यावा आयसीसीच्या स्पर्धेतील महत्वाच्या सामन्यांमध्ये राखीव दिवसाची सोय केली जाते. आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतही राखीव दिवस असेल. मात्र आयसीसीने अचानक मोठा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेतील सेमीफायनलच्या पहिल्या सामन्यासाठी राखीव दिवस असणार आहे. तर दुसऱ्या सेमीफायनलसाठी राखीव दिवस नसणार आहे.

काय आहे कारण?

दुसऱ्या सेमीफायनलचा सामना २७ जून रोजी खेळवला जाणार आहे. जर यादिवशी पाऊस पडला आणि सामना होऊ शकला नाही, तर राखीव दिवस २८ जूनला ठेवावा लागेल. म्हणजे हा सामना जिंकणाऱ्या संघाला लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे २९ जून रोजी फायनल खेळण्यासाठी मैदानावर यावं लागेल.

सामना रद्द झाल्यास काय?

या स्पर्धेतील सेमीफायनलच्या सामन्यांबद्दल बोलायचं झालं, तर पहिला सामना स्थानिक वेळेनुसार रात्री ८ वाजता खेळला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी ६ वाजता सुरु होईल. तर दुसऱ्या सेमीफायनलचा सामना स्थानिक वेळेनुसार सकाळी १०: ३० वाजता आणि भारतीय वेळेनुसार रात्री ८:३० वाजता सुरु होणार आहे. जर सामन्यावेळी पाऊस पडला,तर त्याच दिवशी ४ मिनिटांचा वेळ वाढवून दिला जाईल. मात्र तरीही सामना न झाल्यास हा सामना रद्द केला जाईल. हा सामना रद्द झाल्यास जो संघ सुपर ८ मध्ये मजबूत स्थितीत असेल, तो संघ फायनलमध्ये प्रवेश करेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election:प्रचाराच्या तोफा थंडावणार, मतदानाच्या ४८ तासाआधी काय करावे? काय करु नये?

Maharashtra Election : प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! छुप्या प्रचारावर करडी नजर

Viral Video: रुग्णवाहिकेला रस्ता न देणे महागात पडले, पोलिसांनी शिकवल धडा, लाखोंचा दंड, लायसन्सही रद्द, Video बघाच

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दर महिन्याला मिळणार ९००० रुपये; कसं? जाणून घ्या

Success Story: IIT मुंबईमधून शिक्षण, लाखोंची नोकरी नाकारली, अवघ्या २२ व्या वर्षी UPSC क्रॅक ;IAS सिमी करण यांची सक्सेस स्टोरी

SCROLL FOR NEXT