bhuvneshwar kumar saam tv
Sports

Bhuvneshwar Kumar Last Over : W,W,W,W... भुवीने एकाच षटकात गुजरातच्या ४ फलंदाजांना केलं बाद, तरीही का नाही झाली हॅट्ट्रिक?

Bhuvneshwar Kumar Bowling: भुवनेश्वर कुमारने गुजरातच्या इनिंगला ब्रेक लावला. त्याने अंतिम षटकात ४ गडी बाद केले.

Ankush Dhavre

IPL 2023: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरात टायटन्स संघाने ९ गडी बाद १८८ धावा केल्या होत्या.

शुभमन गिलची आक्रमक खेळी पाहता असा अंदाज व्यक्त केला गेला होता की, गुजरातचा संघाचा डाव २२०-२२५ धावांपर्यंत जाऊ शकतो. मात्र भुवनेश्वर कुमारने गुजरातच्या इनिंगला ब्रेक लावला. त्याने अंतिम षटकात ४ गडी बाद केले.

एकाच षटकात घेतल्या ४ विकेट्स...

भुवनेश्वर कुमार जेव्हा अंतिम षटक टाकण्यासाठी आला, त्यावेळी गुजरातची धावसंख्या ५ गडी बाद १८६ इतकी होती. त्याने या षटकातील पहिल्याच चेंडूवर शतकवीर शुभमन गिलला बाद करत माघारी धाडलं.

तर पुढच्याच चेंडूवर त्याने मागच्या सामन्यात तुफानी अर्धशतक झळकावणाऱ्या राशिद खानला बाद केलं. तिसऱ्या चेंडूवर राशिद खानला हॅट्ट्रिक पूर्ण करण्याची संधी होती. या चेंडूवर त्याने नूर अहमदला धावबाद करत माघारी धाडले.

पुढच्या चेंडूवर दासून शनाकाने १ धाव पूर्ण केली. पुढच्याच चेंडूवर त्याने मोहम्मद शमीला लॉंग ऑनला झेलबाद करत माघारी धाडले. यासह या षटकात सनरायझर्स हैदराबाद संघाने एकाच षटकात ४ गडी बाद केले. मात्र धाव बाद केल्यामुळे भुवनेश्वर कुमारची हॅट्ट्रिक पूर्ण होऊ शकली नाही. (Latest sports updates)

भुवनेश्वर कुमारचे शेवटचे षटक ..

पहिला चेंडू- शुभमन गिलची विकेट

दुसरा चेंडू - राशिद खानचा विकेट

तिसरा चेंडू - नूर अहमद धावबाद

चौथा चेंडू - १ धाव

पाचवा चेंडू - मोहम्मद शमी विकेट

सहावा चेंडू - बाय १ धाव

गुजरातचा विजय

या महत्वाच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकून गुजरात टायटन्स संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. गुजरात टायटन्स संघाकडून प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर फलंदाज शुभमन गिलने सर्वाधिक १०१ धावांची खेळी केली. तर युवा फलंदाज साई सुदर्शनने ४७ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्स संघाने २० षटक अखेर ९ गडी बाद १८८ धावा केल्या होत्या.

या धावांचा पाठलाग करताना हैदराबाद संघाकडून क्लासेनने सर्वाधिक ६४ धावांची खेळी केली. तर भुवनेश्वर कुमारने २७ धावांचे योगदान दिले. मात्र सनरायझर्स हैदराबादचा संघ विजयापासून ३४ धावा दूर राहिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा २१वा हप्ता कधी येणार? समोर आली मोठी अपडेट

वकिलानं महिलेला ओढलं अन् किस करत.. हाय कोर्टाच्या व्हर्च्यूअल सुनावणीमध्ये काय घडलं? VIDEO व्हायरल

Gold Rate Today : धनत्रयोदशीआधी सोन्याची दिवाळी, एक तोळा सोन्याची किंमत १.२८ लाख

Home Lottery: BMC कडून ४२६ घरांसाठी लॉटरी, लोकेशन कुठे अन् किंमती किती? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT